सातारा 

‘त्यांनी’ केली ३०० किमीवरून गोपाळ समाजाला मदत

सातारा (महेश पवार) :
सोशल मीडियाचा गैरवापर व त्यातून होणाऱ्या अनेक दुर्दैवी घटना, आपण सध्या पाहत व ऐकत असतो पण याच सोशल मीडियातून गरीब व गरजूंना मदत करण्याच्या आवाहनाला भाईंदर येथून तब्बल ३०० किलोमीटरचा प्रवास करून जवळवाडी येथिल गोपाळ समाजाला उद्योजक प्रशांत धोंडे यांनी केलेली मदत कौतुकास्पद असून सोशल मिडीयाचा योग्य वापर समाजहिताचा असलयाचे मत मेढा पोलीस स्टेशनचे स.पो.नि अमोल माने यांनी साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
जवळवाडी येथिल गोपाळ वस्तीतील गरीब व गरजू  कुटुंबांची उपासमार थांबावी यासाठी  जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा विलास जवळ यांनी सोशल मीडिया वरून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धोंडेवाडी गावचे सुपूत्र व भाईंदरस्थित युवा उद्योजक प्रशांत धोंडे यांनी जीवनावश्यक वस्तुंची पूर्ण कीट गोपाळ समाजातील सर्व कुटुंबियांना देण्यासाठी उपलब्ध केली. त्याचे वाटप मेढा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. अमोल माने यांचे हस्ते देण्यात आली.  यावेळी बोलताना ते म्हणाले सोशल मीडियाचा योग्य वापर समाजहिताचा ठरणारा आहे हेच आजच्या धोंडे यांनी केलेलया मदतीवरून दिसून येते. समाजातील अनेक दानशूर व सृजनशील लोकांनी पुढे येऊन गरीब व गरजू लोकांना मदत करायला हवी.
satara
जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंंच वर्षा विलास जवळ या वेळी बोलताना म्हणाल्या सोशल मिडीयामुळेच ३ लाखाहून अधिक लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीने विकास कामे केली आहेत. निरपेक्ष भावनेने केलेल्या अवाहनाला प्रशांत धोंडे यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे अजूनही समाजामध्ये चांगुलपणा जिवंत असल्याचे दिसून येते. धोंडे यांनी जीवनावश्यक वस्तुंची किट व  सर्व लहान मुलांना खाऊही देण्यात आला.
यावेळी प्रशांत धोंडे म्हणाले कोरोना काळात या समाजाला मदत करता आली हे मी माझे भाग्यच समजतो.
या कार्यकमाला अर्जुन धोंडे, लक्ष्मण धोंडे,आनंदा धोंडे,सुशांत धोंडे, अरुण जवळ, शामराव चव्हाण, राजेंद्र पवार आदींची उपस्थित होती.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: