गोवा 

​’… म्हणून गरजेच्या आहेत तरंगत्या जेटी’

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर) :
गोव्यातील विविध नदीच्या पात्रात घालण्यात येत अ सलेल्या तरंगत्या जेटी काळाची गरज आहे.स्थानिक आमदारांशी चर्चा करूनच हा प्रस्ताव विचाराधीन झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर याच्या काळात चालना मिळालेला या प्रकल्पाला केंद्र सरकारचे १०० टक्के आर्थिक सहाय्य लाभले आहे.या महत्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध होणे दुर्दैवी असल्याचे  मरीन टेक प्राव्हेेट  लिमिटेड कंपनीचे बिसनेस डेव्हलोपमेंट ऑफिसर कॉस्मे डिसिल्वा यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले,गोवा आणि गोव्याच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी या तरंगत्या जेटीच अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.​ ​या तरंगत्या जेटिच्या अस्तित्वाबाबत  स्थानिक  मच्छीमार तसेच पंचायत ,स्थानिक आमदार याना विश्वासात का घेतले नाही ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,  विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सरकारे येतात जातात.जेटिचां हा प्रस्ताव आजचा नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या काळातील हा प्रस्ताव .गेल्या काही वर्षामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली होती.आज जरी ती प्रत्यक्षात येत असली तरी त्यावेळच्या सरपंचांना या विषयीची कल्पना दिली होती जर सरपंचांनी या विषयी लोकांना विश्वासात घेतले नाही ही आमची चूक नाही ती तत्कालीन सरपंचाची जबाबदारी होती असेही ते म्हणाले.

कॉस्मे डिसिल्वा

गोव्यातील नद्यांवर कॅप्टन ऑफ पोर्टचा अधिकार आहे त्यामुळे पंचायतीना विश्वासात घेणे आवश्यक असलेतरी  राज्याच्या  दृष्टीने  निर्णय घेण्याचा अधिकार कॅप्टन ऑफ पोर्ट ला निश्चितच आहे असेही ते म्हणाले या बाबत बोलणी करायची असल्यास कॅप्टन ऑफ पोर्टशी करावी असे त्यांनी सांगितले.

या तरंगत्या जेटिमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.  बोट व्यवसायात स्थानिक उद्योजक पुढे येत आहेत गोव्यातील ग्रामीण भाग जलामार्गा द्वारे गोव्यातील मुख्य शहराशी जोडला जाईल त्यातून रस्ता अपघात कमी होतील.रस्ता वाहतूकोंडी कमी होतील. गणेश विसर्जन, सांगोड, सांजाव यासारख्या धार्मिक उत्सवाच्या वेळी या जेटि उपयोगात आणता येईल असेही ते म्हणाले.

एकंदर सध्या या तरंगत्या जेटिना होत असलेला विरोध गैरसमजुती मुळेच होत आहे.विरोधकांनी आधी जेटिचां उद्देश समजावून घ्यावा .त्यासाठी आवश्यक असल्यास कॅप्टन ऑफ पोर्टशी चर्चा करावी असेही त्यांनी सांगितले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: