गोवा 

केबलसाठी खणला पावसाळ्यात रस्ता; अभियंत्याला विचारला जाब

पेडणे ​( निवृत्ती शिरोडकर​) :​
आगरवाडा व्हाया पार्से तुये ते पेडणे या रस्त्याला यापूर्वी एकही खड्डा नव्हता. मात्र हल्लीच केबल टाकण्याच्या कंत्राटदाराने भर पावसात रस्ता मधोमध खोदुन धोकादायक स्थितीत ठेवला आहे ​. ​परिणामी जोरदार पाऊस पडल्याने आणि माती रस्त्यावरच असल्याने पाणी जाण्याचा प्रवाह बदला पाणी अनेकांच्या घरात घुसले​. अनेक वाहने रस्त्यावर रुतून पडली , त्यासाठी पार्सेचे जागृत नागरिक तथा गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांच्या ​ने​तृत्वाखाली, स्थानिक नागरिकांनी काम रोखून धरले व ठेकेदाराला जाब विचारला रस्ता विभागाच्या ​अभियंत्याला घटनास्थळी बोलावून घेतले . कोणताही परवाना नसताना ठेकेदाराने मनमानी कारभार करत रस्ता खोदकाम केला आहे.

पार्से येथे रस्त्याचे खोदकाम झाल्यामुळे  जवळपासच्या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ता उध्वस्त करून (जेसीबीने  रस्ता खराब झाला आहे. या मनमानी कारभाराविषयी  पार्से येथील लोकांनी पीडब्ल्यूडी रस्ता विभागाच्या अभियात्याला जाब  विचारला.

या कामाविषयी त्यांना कोणतीच माहिती नव्हती किंवा त्यांच्याकडून त्यांना कोणताही आदेश मिळाला नसल्याने त्यांनी हे काम थांबविले असल्याचे अभियंते गावस  म्हणाले. पीडब्ल्यूडीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्यातील प्रत जोडली असल्याचेही ते म्हणाले.

कंत्राटदाराला ऑर्डर बद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की हे काम करण्यासाठी  नोव्हेंबर २००६  रोजी तो आपल्याकडे ऑर्डर असल्याचे सांगतो​.  स्थानिक पंच सदस्य प्रेमनाथ कानोलकर यांनी याविषयी माहिती देताना स्थानिक पंचायतीला या विषयी कुणीही कळवले नसल्याचे सांगितले .

आयटीआय उताराजवळ रस्ता धोकादायक झाला आहे कारण हा अरुंद रस्ता आहे आणि पावसाळ्यात खोदून रस्ता आठवडा झाला आहे. भर ​पावसाळ्याने हे काम सुरु करून लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या ठेकेदाराविषयी दीपक कलंगुटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली आहे​. ​

यावेळी दीपक कलंगुटकर, माजी जि.प.सदस्य , पंच  सदस्य प्रेमानंद  कांदोलकर, पंच अरुण पार्सेकर, श्याम कांबळी, मधुकर कांबळी, महेश कांबळी, शंकर कांबळी, संदीप कांबळी आणि इतर स्थानिक उपस्थित होते.

हा रस्ता २०१६  मध्ये ​​माजी मुख्यमंत्री प्रा. ​लक्ष्मीकांत पार्सेकर यां​​नी केला  . रस्त्याची गुणवत्ता राखली गेली होती आणि हा रस्ता करताना सर्व लोकांनी सहकार्य केले. शिक्षणासाठी ब्रॉडबँडच्या नावाखाली पेडणे तालुक्याचा एक उत्कृष्ट रस्ता आता खराब झाला आहे.

गोवा फॉरवर्ड चे दीपक कलंगुटकर यांनी बोलताना हा सुंदर रस्ता त्याची निगा सरकारने राखायला हवी , शिवाय या कामामुळे ज्या स्थानिक लोकांच्या घरात पाणी घुसून नुकसानी झाली त्याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत , या रस्त्याला कोणीच वाली नसल्यासारखे कंत्राटदाराने मनमानी केली आहे ती या पुढे खपवून घेतली जाणार नाही . असा इशारा दीपक कलंगुटकर यांनी दिला .

एखाद्याला घरगुती जलवाहिनी घेताता रस्ता खोदकाम करण्यासाठी रस्ता विभाग पावसाळ्यात ना हरकत दाखला देत नाही . मात्र एखादी कंपनी २००६ चा परवाना घेवून चक्क पावसाळ्यात रस्ता खोदकाम करत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली , रस्ता विभागाने ठेकेदाराला काम बंद ठेवण्याची सुचना केली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: