गोवा 

”ते’ सगळे प्रकल्प २०२२ नंतर काँग्रेस करणार रद्द’

मडगाव :
डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. ज्युलिओ मिनेझिस या आणि अशा अनेक ज्ञात- अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य पणाला लावले. आपल्या आजवरच्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याची स्वतंत्र ओळख राखण्यासाठी प्राधान्य दिले, आणि त्यासाठी संघर्ष केला. अशावेळी त्यांनी पाहिलेली स्वतंत्र आणि स्वाभिमानी गोव्याची स्वप्ने पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळेच २०२२ मध्ये सत्तास्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्ष गोव्याच्या अस्मितेला आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे सगळे प्रकल्प रद्द करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी लोहिया मैदान येथे केले.

७५ व्या गोवा क्रांति दिनानिमित्त काँग्रेसच्यावतीने मडगाव येथील लोहिया मैदानात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते . त्यावेळी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळयाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगांवकर आणि गोपाळ चितारी यांचा सत्कार करण्यात आला.

goa revolution day
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी मंत्री आलेक्स सिकेरा, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के.शेख, अल्तिनो गोम्स, प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्ष बीना नाईक, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष जॉय डायस, मडगाव विभाग अध्यक्ष गोपाळ नाईक, प्रियोळ विभाग अध्यक्ष हेमंत नाईक आणि मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन केले.

गोवा स्वातंत्र्य संग्रामाच्या आजच्या या ऐतिहासिक दिवशी आम्ही आज गोंयकारांचा आवाज म्हणून सदैव काम करत राहू अशी प्रतिज्ञा करत आहोत. राज्याची समृद्ध परंपरा, ओळख, अस्मितेच्या जपणुकीसाठी आणि समृद्धतेसाठी आम्ही पक्ष म्हणून नेहमीच कार्यरत राहू. काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य गोंयकारांचा पक्ष राहिला आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खामध्ये आम्ही सोबत असतो. त्यामुळेच जनमताचा आदर करत आम्ही सेझ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आमचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून जनतेच्या प्रत्येक भावनेचा आम्ही यथोचित आदर करतो, असेही यावेळी दिनेश गुंडू राव यांनी नमूद केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: