गोवा 

दिलीप परुळेकरांनी वाटले शेतकऱ्यांना मोफत खत

म्हापसा :

साळगावचे माजी आमदार तथा माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यावतीने साळगाव मतदारसं​​घातील शेतकऱ्यांना साळगाव भाजप कार्यालयात खतांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करोना महामारीमुळे सर्वांचे आर्थिक नियोजन ढासळले असून जगणे मुश्किल झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची ही हीच परिस्थिती आहे. बळीराजा जगला तरच आपण जगू. यामुळे बळीराजाला मदत करणे मी माझे कर्तव्य समजतो, असे उदगार यावेळी परुळेकर यांनी काढले.

साळगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खत घेण्यासाठी येताना आपले आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. साळगाव मतदारसंघात शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना खताची अडचण भासू नये यासाठी मोफत खत वाटप करणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.

उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी दिलीप परुळेकर यांचे आभार मानले. कोरोना महामारीच्या काळात परुळेकर यांनी आम्हाला केलेली मदत लाख मोलाची असल्याचे सांगितले. साळगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: