गोवा 

‘उत्तम प्रशासनासाठी घेणार विद्यार्थ्यांकडून संकल्पना ‘

​मडगाव :

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याची स्वतंत्र ओळख राखण्यासाठी सदैव प्रयत्न केला, त्यामुळे आपण त्यांचे आदर्श गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. मला अत्यंत आनंद होतोय की काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 2022 मध्ये राज्यात सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस पक्ष उत्तम प्रशासनासाठी या आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांकडून नेहमीच चांगल्या संकल्पनांचे स्वागत करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश राव यांनी केले ते गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमांमध्ये मडगाव येथे बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री आदुआर्दो फालेरो, पक्षाचे गोवा निरीक्षक प्रकाश राठोड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे यावेळी मंचावर उपस्थित होते.

गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी सर्वस्व पणाला लावले. त्यांच्यामुळेच आज आपण हा दिवस बघू शकतो. त्यामुळे या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या परिवारांचा आपण नेहमीच सन्मान केला पाहिजे. असे सांगत, काँग्रेस पक्षाने या दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या  निबंध स्पर्धेचे कौतुक करत, प्रत्येक गोंयकाराने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील गोवा राखण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी  आदुआर्दो फालेरो यांनी केले.

​​गोव्याबाबत अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारला घरी पाठवण्यासाठी आता नवीन क्रांती सुरू करण्याची योग्य वेळ आली आहे. त्यामुळे गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी जनतेने काँग्रेसला पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.

​​

​प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी मान्यवरांना डॉ. राम मनोहर लोहिया यांनी लिहिलेले पुस्तक भेट म्हणून दिले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी आभार प्रदर्शन केले तर पक्ष प्रवक्त्या पल्लवी भागात यांनी सूत्रसंचालन केले. ​

​यावेळी ​माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, प्रदेश उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स, संकल्प आमोणकर, महिला प्रदेशाध्यक्ष बिना नाईक, महासचिव सुभाष फळदेसाई, माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर, द.गोवा प्रमुख जॉय डायस, उ. गोवा प्रमुख विजय भिके, मडगाव उपाध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेविका लता पेडणेकर, सॅन्ड्रा फर्नाडिस, दामोदर वरक, सगुण नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
goa congress
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: