गोवा 

द. गोव्यात ‘एनएसए’ लागू ; कॉँग्रेसने केली टीका

पणजीः
दक्षिण गोव्यात पुढील तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यासंबंधीचा आदेश गृह खात्याचे अवर सचिव प्रतिदास गांवकर यांनी आज लागू केला. या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे या आदेशात नमूद  केले आहे. तर , विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि कॉँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी हा कायदा लागू करण्याच्या सरकारच्या कृतीचा ट्विटरद्वारे निषेध केला आहे.

 

सरकारच्यावतीने प्रसारित निवेदनानुसार, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरण घोषित करण्याचा आदेश दर 3 महिन्यांनी दिला जातो. हा एक नियमित आदेश आहे जो जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एनएसए कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या कोणत्याही प्रस्तावांची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करतो. हे नेहमीचंच आहे आणि त्यात नवीन असं काही नाही. हे अधिकार राज्य सरकार जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलिस प्रमुखांना सोपवते.

दरम्यान, सरकारकडून राज्यात दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू केल्यानंतर विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘काँग्रेस पक्षाने आज गोवा क्रांती दिनी बेजबाबदार भाजप सरकारच्या विरूद्ध मुक्तीचा नारा दिल्यानंतर, घाबरलेल्या डॉ. प्रमोद सांवत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याचा आदेश जारी केला. जनतेचा आवाज दडपण्यासाठी आणि गोमंतकीयांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी जाहीर केलेल्या सरकारी निर्णयाचा मी तिव्र निषेध करतो.’

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: