कला-साहित्य

‘लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन’वर  ‘एक मुलाखत’

पेडणे (प्रतिनिधी) :
गोवा दूरदर्शनच्या “एक मुलाखत” या कार्यक्रमांतर्गत गोवा राज्य जैविक विविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप सरमोकादम यांच्याशी “लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन” या विषयावर चर्चेचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २४ जून 202१ रोजी संध्याकाळी ठीक ६.०० वाजता गोवा दूरदर्शनवर प्रेक्षेपित होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधतील सामाजिक कार्यकर्ते राजमोहन शेटये. या कार्यक्रमाची निर्मिती राजेन्द्र फडते यांची असून “एक मुलाखत” या कार्यक्रमाअंतर्गत तो सादर होणार आहे. गोव्यासारख्या निसर्गप्रधान राज्यात पर्यावरण संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. आज दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपण पाहत आहोत. यादृष्टीने हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमचा सर्वांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: