सातारा 

”तो’ ओढा, बंधारा बुजवला कसा?’

सातारा (महेश पवार) :

तालुक्यातील डबेवाडीत रोडलगत असलेला ओढा बुजवला असून त्या ओढ्यावर असलेला बंधारा देखील बुजवण्यात आला आहे. याठिकाणी प्लॉटिंग करण्यासाठी लेवल करण्यात आली आहे. ओढा व बंधारा बुजवला गेला कसा महसूल विभागांचे याकडे दुर्लक्ष आहे का? अधिकारी काय झोपा काढतायत का? असा सवाल नागरिक करत आहेत.

गेले आठवडाभर चालू असलेल्या पावसाने याठिकाणी ओढा व बंधारा बुजवून त्या ठिकाणी भरलेला भराव वाहून गेल्यामुळे काही काळ ओढाही तुबंला. यामुळे पावसाचे पाणी सगळं रस्त्यावर येत आहे.

शासन एकिकडे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणते पण , शासनाचे नोकर ठेकेदाराकडून चिरीमिरीत गुंतलेत का काय म्हणून, म्हणून महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत? असा सवाल नागरिक करत आहेत.

satara
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: