सातारा 

‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’

कराड (अभयकुमार देशमुख) :​
माण तालुक्यातील आंधळी गावचे रहिवासी दादा काळे हे गेल्या पाच वर्षापासून युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आहेत. दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दादाकाळे यांची माण तालुका अध्यक्षपदी निवड केल्याचे  सातारा जिल्हा​ ​कॉंग्रेसअध्यक्षांना पत्र दिले ​ ​परंतु, दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने या निवडीस स्थगिती दिल्यानंतर लगेचच दादा काळे यांनी आपला मूळ रंग दाखविण्यास सुरुवात केली. त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री​,​ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेवर आणि काँग्रेस पक्षावर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. माण-खटाव तालुक्यामधील सर्व धनगर समाज पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा आ​हे, असे प्रतिपादन माण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ​अँड. संदीप सजगने​ यांनी केले. ​

आजपर्यंत काँग्रेस पक्षाने खटाव व माण तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना, माण खटावचा शेती पाणी प्रश्न असेल, शेळी मेंढी पालकांच्या काही अडचणी असतील अगर पृथ्वीबंधारे सह खटाव माण मधील इतर विकास कामांना पृथ्वीराज चव्हाण यांनी धनगर समाज व एकूणच माण खटावला नेहमीच झुकते माप देण्याचा प्रयत्न केला ​असल्याचेही सजगने यानी नमूद केले. ​


दादाकाळे यांचे निवडीस स्थगिती दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्याकडून धनगर समाजावर अन्याय झाला आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे? यात समाजाचा प्रश्न येतोच कोठे? तसे असते तर काळेआपण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी झालाच नसता? व माझ्यासारख्या आपल्या धनगर समाजातील,  राजकारणात अत्यंत नवख्या असणाऱ्या तरुणाला माण तालुका युवक काँग्रेसचे पद मिळालेच नसते? यावरून असे दिसते की, माण खटाव तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्ष व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेहमीच ताकद दिली आहे. हे आपण सोईस्कररित्या विसरलात का? आपणास पृथ्वीराज ​चव्हाण यांच्यामुळेच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले व आपण जिल्हा परिषद सदस्य झाला होता​ याचीही आठवण सजगने ​यांनी यावेळी करून दिली. 

satara congress
अँड. संदीप सजगने​

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीस पूर्णपणे अंधारात ठेवून आणि प्रदेश काँग्रेसची दिशाभूल करून आपण माण तालुका कांग्रेस अध्यक्षपदाचे पत्र मिळवले मात्र दुसऱ्याच दिवशी यास स्थगिती मिळाली यावरून आपले बोराटवाडीशी असणारे स्नेहसंबंध तरी कारणीभूत नाहीत ना?​ असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. ​

आपणाकडे प्रदेश युवक काँग्रेसचे पद असल्याने एकाच व्यक्तीकडे पक्षाची दोन पदे असणे हे काँग्रेसच्या धोरणात बसत नाही. याचा आपणास विसर पडला की काय? या संपूर्ण प्रकरणात आपला व्यक्तिगत हितसंबंध आहे. यासाठी काँग्रेस पक्षाकडून धनगर समाज किंवा समाजाला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही खटाव-माण मधील संपूर्ण धनगर समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी एकनिष्ठपणे उभे आहोत. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कृपा करून समाजाचा वापर करू नका. धनगर समाज हा सुज्ञ असून त्यांना खऱ्या खोट्याची जाण आहे. म्हणून व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजाचे नाव घेऊन पक्षाची व नेत्यांची बदनामी करण्याचा काहीही एक अधिकार नाही याचा विसर पडू देवू नका. आपणास राजकारणातील विविध पदे मिळाली आणि ज्यांच्या मुळेच आपणास राजकीय ओळख मिळाली त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज ​च​व्हाण व काँग्रेस पक्षाची सोशल मीडियावर केलेल्या बदनामीचा आम्ही जाहीर निषेध करीत असून यापुढे आपले असले घाणेरडे प्रकार खटाव माण मधील सुज्ञ धनगर समाज कदापीही खपवून घेणार नाही​, असे सजगने यांनी यावेळी सांगितले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: