गोवा 

‘…म्हणूनच राज्यात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी’

पेडणे (प्रतिनिधी) :
भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. भाजपा सरकारने आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर क्रीडा खात्यातील २७४ हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची किमया फक्त भाजपाच करू शकतो ,आता याही पुढे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी जनतेने याही पुढे भाजपाला साथ देण्याचे आवाहन क्रीडा मंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या क्रीडा खात्यातील विविध भागातील २७४ हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणारे पत्र वितरीत केल्यानंतर बोलत होते.

२००७ ते २००८ या दरम्यान राज्यातील एकूण २७४ हंगामी कर्मचारी म्हणून क्रीडा खात्यात भरती केली होती , त्यानंतर आलेल्या सरकारने त्याना कायमस्वरूपी केले नाही . त्यात पेडणे तालुक्यातील एकूण ७५ कर्मचारी होते . ते हंगामी विविध भागात काम करायचे , आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा या कर्मचाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर यायचा . ज्यावेळी २०१७ साली भाजपा मगो संयुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मनोहर पर्रीकर यांनी दिला , त्यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून  आपण अगोदर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आश्वासन घेतले होते . आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजारी पडण्यापूर्वी या फाईलवर स्वाक्षरी केली होती , त्याचा पाठपुरावा करून आता सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतल्याचे सांगितले.

 

यावेळी क्रीडा अधिकारी सदा सावळ देसाई , पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर , चांदेल सरपंच संतोष मळीक भूषण नाईक, रामा सावळ देसाई आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकारांकडे बोलताना जनतेचे सरकार जनहित पाहत आहे , याही पुढे सरकारचे हात बळकट करून नव्या जोमाने सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी सरकारच्या मागे खंबीर उभे राहावे , असे आवाहन केले.

 

विरोधकावर दुर्लक्ष करा :
सध्या विरोधक हातात सत्ता नसल्याने आणि जनतेच्या रोषाला सामने जावे लागत आहे , शिवाय त्यांच्याकडे कोणताच कार्यक्रम जनतेसमोर नाही , केवळ आपले वर्तमानपत्रात फोटो यावेत यासाठी ते धडपडतात , हि लोकशाही आहे कुणीही निवडणुकीला उभा राहू शकतो . मात्र आपल्यावर टीका करणाऱ्यानी आपण आमदार होण्यापूर्वी मतदार संघ कसा होता त्याचा अगोदर अभ्यास करावा असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कुणाचेही नाव न घेता सल्ला दिला.

 

भाजपाचे २८ आमदार येतील :
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नैतृत्वाखाली भाजपाचे २८ आमदार येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त करून विरोधकाना त्यांची जागा त्याना दाखवली जाणार, पेडणेचे दोन्ही जागेत भाजपचे आमदार असतील व दोघेही मंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला.

 

पेडणे तालुक्यातील होवू घातलेल्या विविध प्रकल्पातून रोजगारांच्या संधी स्थानिकांनाच मिलणार आहे , आणि आपले तसे सरकारदरबारी प्रयत्न आहेत , सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळत नसल्यातरी सामाधनकारक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मतदार संघातील होवू घातलेल्या प्रकल्पातून मिळू शकतात आणि तसी  क्षमता आणि संधी उपलब्ध होणार असे उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले. कोरोनाची लाट अजून ओसरलेली नाही , जनतेने आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी कोरोनाचे नियम आहे ते सर्वांनी पाळायला हवे . असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: