गोवा 

‘निरोगी स्वास्थासाठी नियमित करा योगासने’

पेडणे (प्रतिनिधी) :
साधू संतांच्या काळापासून हि योगासने चालू आहेत , प्राचीन काळाचे त्याला महत्त्वें असल्याने प्रत्येकाने दररोज विविध प्रशिक्षक गुरुजनांकडून मार्गदर्शन घेवून योगासने करावे व आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी तोरसे येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव सभागृहात आयोजित केलेल्या योगा दिनाचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले .

या वेळी जिल्हासदस्या सीमा खडपे , पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस ,माजी सरपंच बबन देसौझा माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर , सरपंच अशोक सावळ ,चांदेल सरपंच  संतोष मळीक ,कासार्वारणे सरपंच ,पांडुरंग पार्सेकर , डॉक्टर दामोदर , पार्थना मोटे आदी उपस्थित होते .

उद्घाटन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोताताना , हे स्पर्धात्मक युग असल्याने प्रत्येकाला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठराविक वेळ द्यायला हवा . आरोग्य तंदुरुस्त ठेवायला हवे . असे सांगून नियमित विविध प्रकारची योगासने करून गोळ्या औषधा पासून आपल्या शरीराला दूर ठेवू शकतो त्यासाठी मात्र योग्य ते गुरुजनांचे प्रशिक्षण मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे असे सांगितले .

goa bjp
दोन्ही डोस घ्या :

कोरोनावर आम्हाला १०० टक्के यश मिळवायचे आहे , त्यासाठी एका हाताने टाळी वाजणार नाही तर त्यासाठी सरकारच्या उपक्रमाला १०० टक्के नागरिकांनी प्रतिसाद देवून कोरोनाचे दोन्ही डोस घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले .

जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे यांनी बोलताना आपल्या सुंदर अश्या शरीराला आरोग्याला योगाची गरज आहे . साधु संता पासून चालत आलेली योगासने आज जागतिक पातळीवर पोचली आहेत , धकाधकीच्या जीवनात आपल्याआरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो , जास्त करून महिला वर्ग आपल्या आरोग्याकडे कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष करतात . महिलांनी अगोदर काळजी घ्यायला हवी , महिला सक्षम बनली तरच पूर्ण कुटुंब सक्षम बनणार असल्याचे त्यांनी सांगितले .

पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी बोलताना योगाला अनन्यसाधारण महत्व आहे . प्रत्येकाने दिवसातील ठराविक वेळेत नियमित व्यायाम योगासने करण्याची गरज आहे . शरीराला विविध ओषध गोळ्यापासून दूर ठेवायचे असेल तर योगासने नियमित करायला हवी असे ते म्हणाले .

सरपंच अशोक सावळ यांनी स्वागत करताना जागतिक योगादिनानिमित्ताने आम्ही प्रतिज्ञा घेवूया कि नियमित आम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी योगासने करणार. माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर यांनी प्रस्ताविक केले . यावेळी अनेक नागरिकांनी योगासने केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: