सातारा 

‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’

  • संजय पारठे

महाबळेश्वरमध्ये वटवाघळामुळे निपाह होण्याचा धोका आहे.  अशी खोडसाळ बातमी देत महाबळेश्वरची नाहक बदनामी होत आहे. या भागात प्रामुख्याने फिरत असल्याने त्याबद्दल मला असलेली माहिती पुढीलप्रमाणे…

वटवाघळे ही तापोळा गावी नदी काठी दोन जांभळीच्या झाडावर आढळतात. दुसरे सिचींन गहळ म्हणजे राॅबट केव्हज या ठिकाणी असंख्य आढळतात. तिसरे म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरमधील कृष्णमाई मंदिर हे पुरातत्व यांचेकडे असून तिथे अगदी मोजकीच 7 ,8 लहान आकाराची आढळतात.

या पैकी कोणत्या ठिकाणची वटवाघळे पकडुन त्याच्यावर प्रयोग केला कोणत्या शासकीय कार्यालयाची मदद घेतली किंवा कोणत्या शासकीय ऑफीसच्या परवानगीशिवाय हा प्रयोग केला आणि हा निपाह व्हायरल महाबळेश्वर ला प्रसिद्ध केला? एक तापोळा नदी काठी असलेली असंख्य वटवाघळे असुन त्यांची जागा कोणाची माहीत नाही पण फॉरेस्ट ची परवानगी घेतली का? किंवा त्यांना या बाबत माहीती दिली का ? दुसरे सिचींन घळ येथे अनेक वर्षांपासून या गुहेत असंख्य वटवाघळे आहेत तर ही टीम या लाॅक डाऊन काळात फॉरेस्ट च्याच विना परवानगीशिवाय ते या गुहेत जाऊन प्रयोग कसा केला किंवा तिथून पकडुन का आणण्यात आले तिसरे कृष्णमाई मंदिर लाॅक डाऊन काळात बंद असताना तर या मंदिर जाऊन कोणाच्या परवानगीशिवाय या वटवाघळावर प्रयोग कसा केला ही सखोल चौकशी केली पाहीजेल असे मला वाटते.

मागील वर्ष असेच लाॅकडाऊन काळात मला ससुन रोडवर मला मृत अवस्थेत वटवाघळ झाडावर दिसले मी लगेच फॉरेस्ट ऑफीस मधील राऊत यांना फोन करून दिसलेले वटवाघळ बाबत माहीती दिली लगेच दोन ऑफीसर आले त्याला सॅनीट्रजर मारून घेवुन गेले मग त्या वेळेस हा प्रयोग का करण्यात आला नाही त्यावेळेस ही वटवाघळामुळे करोना पसरतो ही आफवा पसरली होती त्यावेळेस ही महाबळेश्वर तालुक्यातील करोना पाॅझीटीव रूग्ण कमी होते.

तर आताच या गोष्ट कश्या काय याबद्दल सखोल चौकशी होवुन महाबळेश्वर ची बदनामी थांबवावी, ही विनंती.
महाबळेश्वर आजु बाजूस 15, 20 छोट्या मोठ्या गुहा आहेत पण एकाच सिचींन घळ या गुहेत असंख्य वटवाघळ आढळतात.
सव॔ महाबळेश्वरातील लोकांनी आजीबात घाबरून जाऊ नका ही अनेक वर्ष वास्तव करीत आहेत यांचे पासुन आज पय॔त कोणताच मनुष्याला किंवा प्राणाला कोणताच धोका निर्माण झाला नाही असे माझ्या माहीती प्रमाणे आहे तरी ही शासकीय निर्णय घेतीलच आपण कोवीड चे नियम पाळून बिनधास्त राहवे ही विनंती. निपाहची काळजी करण्याचे कारण नाही.

(लेखक महाबळेश्वर येथील सह्याद्री अॅडव्हेचर ट्रेकर्सचे सक्रिय सहकारी आहेत.)

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: