गोवा 

‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’

पेडणे (प्रतिनिधी) :
एकाच देशात दोन संविधान आणि तिरंग्याशिवाय दुसरा झेंडा चालणार नाही. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे असे ठणकावून सांगणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सांगितले होते , देशावर निष्ठा असणाऱ्यांची आज देशाला खरी गरज आहे असे उद्घार पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी पेडणे येथे भाजपा डॉक्टर श्याप्रसाद मुखर्जी यांचा भाजपातर्फे बलिदान दिवस साजरा करताना काढले .

यावेळी भाजपा सरचिटणीस आणि पेडणे नगराध्यक्षा उषा नागवेकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई , माजी उपनगराध्यक्ष रामा सावळ देसाई , प्रकाश कांबळी . माजी सरपंच संजय तुळसकर , माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ , जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर आबा तळकटकर आदी उपस्थित होते .

तुलसीदास गावस यांनी बोलताना प्रखर राष्ट्रवादी विचाराचे नेते’ अशीही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ओळख होती. भारताच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला. राष्ट्रीय पातळीवर जरी भारत-पाकिस्तान अशी धर्माच्या आधारावर झालेली फाळणी जरी त्यांना रोखता आली नाही तरी बंगालच्या अखंडतेसाठी त्यांनी सर्वातोपरी लढा दिला आणि कोलकात्यासह हिंदूबहुल प्रदेश भारताशी जोडून ठेवण्यात जी लढाई ते लढले त्यात त्यांनी यशही मिळवले असे गावस म्हणाले .

पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनात भारतमातेच्या अखंडतेसाठी अति महत्त्वाची लढाई ठरली ती म्हणजे काश्मीरची. १९५२ साली पंतप्रधान नेहरू यांनी काश्मीरला विशेषाधिकार देण्याच्या नावाखाली वेगळे संविधान आणि वेगळा झेंडा उभारण्याचे स्वातंत्र्य दिले. भारतमातेचे हे अशा प्रकारे संविधानाचे तुकडे पडणे भविष्यासाठी धोक्याचे आहे, हे डॉ. मुखर्जी यांनी वेळीच ओळखले. एकाच देशात दोन संविधान आणि तिरंग्याशिवाय दुसरा झेंडा चालणार नाही. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. भारताचे तुकडे पडू देणार नाही, अशी जहाल भूमिका घेत डॉ. मुखर्जींनी काश्मीरसाठी आपला लढा उभारला. या लढ्यात भारतमातेचा शिरोमणी असलेल्या, स्वर्गनंदनवनातच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वीरमरण आले.अश्या त्या म्हणाल्या .

जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर , माजी जिल्हा सदस्य रमेश सावळ ,रामा सावळ देसाई आदींनी आपली आदरांजली वाहिली .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: