गोवा 

‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
राज्यात गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत साडे चारशे कोटींची कामे सुरु आहेत ,आपण चेअरमनपद स्वीकारल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यातून विकासाला पाठबळ मिळत आहे असे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांनी विर्नोडा पंचायत क्षेत्रात वन महोत्सव साजरा करताना सांगितले .

२४ रोजी विर्नोडा पंचायत क्षेत्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला वनाधिकारी संतोष फडते , मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब , विर्नोडा सरपंच मंगलदास किनळेकर ,उपसरपंच अनुपा परब ,पंच शैलेंद्र परब , माजी सरपंच प्रशांत राव , पंच अनुपा कांबळी , देवस्थान अध्यक्ष उमेश परब व इतर उपस्थित होते .

आमदार दयानंद सोपटे सरपंच मंगलदास किनळेकर आदीच्या हस्ते मंदिर परिसरात झाडे लावून वनमहोत्सव साजरा करण्यात आला .

यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना झाडांचे महत्व प्रत्येकाच्या जीवनाशी जवळचा संबध आहे , सरकार दरवर्षी वनखात्यातर्फे झाडे वितरीत केली जातात त्या झाडांची योग्य ती काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असे सांगितले .

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना पर्यटन महामंडळामार्फत राज्यात आणि पर्यायाने पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मंदिर परिसर सुशोभीकरणाची कामे जोरात चालू आहे . उर्वरित कामासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: