क्रीडा-अर्थमतगोवा 

‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’ 

पेडणे (प्रतिनिधी) :
बाॅक्सिंगमधील बारकावे कदाचित ठाऊक नसतील पण, बाॅक्सिंगबद्दल निश्चितच आस्था असून बाॅक्सिंगसह सर्वच खेळांचा व खेळाडुंच्या विकासाची आपल्यास तळमळ आहे, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

टोकियो आॅलिंपिकसाठी तांत्रीक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल गोवा बाॅक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष लेनी डिगामा यांचे आजगावकर यांनी अभिनंदन केले आहे. डिगामा यांची जगातील सर्वात मोठ्या क्रीडा सोहळ्यासाठी झालेली निवड गोमंतकियांसाठी अभिमानाची बाब आहे. गोव्यासाठी गौरव प्राप्त करून दिल्याबद्दल डिगामा यांचे अभिनंदन असे आजगावकर यांनी सांगितले. डिगामा यांचा क्रीडा खात्यातर्फे लवकरच सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बाॅक्सिंग संघटनेला देय असलेले अनुदान प्रलंबित असल्याचा मुद्दा डिगामा यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या कैफियतीची दखल आपण घेतली असून योग्य प्रक्रियेद्वारे हा विषय सोडवण्यात येईल, असे आश्वासन आजगावकर यांनी दिले.
खेळ व खेळाडुंचा विकास व्हावा हा आपला ध्यास असून क्रीडा खात्याचे याच दिशेने प्रयत्न सुरु असतात. शिक्षण, करीअरकडे लक्ष केंद्रीत करताना क्रीडा गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीच आपण क्रीडा धोरण आणले. या क्रीडा धोरणाचा आज हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. खेळ व खेळाडुंची प्रगती व्हावी हाच उद्देश यामागे आहे, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: