गोवा 

राज्यव्यापी कर्फ्यू 5 जुलै पर्यंत वाढवला

पणजी :
राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये आणखी ७ दिवस वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. सोशल मीडियामध्ये पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. लवकरच याबाबतचा अधिकृत आदेशही जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी केला जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कर्फ्यू वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील कर्फ्यू सात दिवसांनी वाढवला असून आता 5 जुलै पर्यंत राज्यात कर्फ्यू लागू असणार आहे. 5 जुलै रोजी सकाळी सात पर्यंत कर्फ्यू लागू असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: