गोवा 

”त्या’ जेट्टीविरोधात प्रसंगी न्यायालयातसुद्धा जाणार’

पेडणे (प्रतिनिधी) :

कामुर्लीतील ‘त्या’ तरंगत्या जेटी विरोधात शापोरा नदी तीरावरील सर्व पंचायती एकत्र झाल्या असून शापोरा नदीतून सदर जेटी हद्दपार करण्याचा निर्धार रविवारी कामुर्ली येथे झालेल्या सभेत करण्यात आला. प्रसंगी या जेटीविरुद्ध न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

कामुर्ली  येथील फेरी धक्याजवळ शापोरा नदी  बचाव आंदोलन समितीची सभा घेण्यात आली. या सभेला कामूर्ली सरपंच विशांत गावकर, उपसरपंच अभय पेडणेकर, पंचायत सदस्य शरद गाड, तुषार नाईक, संध्या नाईक, दशरथ हलर्णकर आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, उपसरपंच समिता राऊत, पंच नितीन चोपडेकर, ओशेल उपसरपंच मंगेश चोडणकर, बलभीम मालवणकर, हणजूण सरपंच सॅवियो आल्मेदा, पंचसदस्य संदेश खोर्जुवेकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, शापोरा आंदोलन बचाव समितीचे दयानंद कृष्णा मांद्रेकर, समर्थ संघटनेचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकार, शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर, आगरवाडा चोपडे पंचायतीचे माजी सरपंच अमोल राऊत, जनार्दन ताम्हणकर, कामुर्ली, ओशेल ,शिवोली, मोरजी, चोपडे, आगरवाडा, शापोरा, हणजूण कायसुव, पार्से, तुये व इतर गावातील लोक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

जेटीला सर्वप्रथम शिवोलीत समर्थन गोवा संघटनेने विरोध केला. या पुढे जेटी हटविण्यास संघटना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन निलेश वेर्णेकर यांनी दिले.तुये गावात औद्योगिक वसाहत असल्याने लोकांना ये जा करण्यासाठी पूल बांधण्याची गरज होती.तशी घोषणाही करण्यात आली होती पण पूल बांधायचे सोडून येथे जेटी ठेवण्यात आली.लोक जे मागतात ते दिलें जात नाही पण नको असलेली जेटी नदीत ठेवण्यात अली असून ही  जेटी त्वरित हटवावी अशी मागणी दीपक कळंगुटकर यांनी केली.

विश्वजित परब ,बलभीम मालवणकर,अमृत अगरवडेकर,जनार्दन ताम्हणकर, अमोल राऊत, सतीश शेटगावकर, मंगेश चोडणकर यांनीही आपल्या भाषणात जेटी हटविण्याची मागणी केली.

सुरुवातीला जेटी कायसुव येथे ठेवण्याचे प्रयत्न होते पण विरोध करणार हे कळल्याने शिवोलीत जेटी नेण्यात आली .त्यानंतर या जेटीचे कामुर्लीत स्थलांतर करण्यात आले . जेटी ठेवताना मच्छिमारना विश्वासात घेतले होते का ?असा प्रश्न मायकल डिसुझा यांनी केला.जेटी विरोधात गरज पडल्यास न्यायालयात जावे असा सल्लाही डिसुझा यांनी दिला.

शापोरा नदी ही  मच्छिमारांची पारंपरिक मालमत्ता आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.नदीचा मालकी हक्क मच्छिमारांना देण्यात आलेला नसल्याचे शरद गाड यांनी स्पष्ट केले. मात्र केंद्र सरकारच्या घशात शापोरा घालण्याचा घाट आहे तो हाणून पाडू  तरंगत्या जेटीमागे सरकारच छुपा अजेंडा असलायचा आरोपही कमुरलीचे पंच शरद गाड यांनी केला.जेटीला कामुर्लीत थारा नकोच असे ग्रामस्थ जयवंत गावकर म्हणाले.
camurli
कामुर्ली पंचायतीची प्रशंसा :
शापोरा बचाव आंदोलन समितीने कामुर्ली पंचायतीची प्रशंसा केली. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सातही सदस्य एकजूट आहेत ही गोष्ट  प्रशंसनीय आहे. पंचायत मंडळ प्रशंसेस पात्र ठरत असल्याचे समिती सदस्य दयानंद मांद्रेकर यांनी म्हणाले.घरचा भेदी असल्यानेच शिवोलीहून जेटी कामुर्लीत आल्याचे शरद गाड यांनी स्पष्ट केले. एका देवस्थान समितीने जेटीसाठी  कोणत्या कायद्याने परवानगी दिली असा प्रश्न सरपंच विशांत गावकर यांनी केला.जेटी कामुर्ली पाठविण्याच्या आदल्या जेटीविरोधात पंचायतीने ठराव घेतला होता. इतकेच नव्हे तर पंचायतीला अंधारात ठेवून जेटी कामुर्लीत सकाळी आल्यानंतर त्वरित दुपारी बंदर व कॅप्टन विरोध करणारे पत्र पाठविण्यात आल्याचे सरपंचानी स्पष्ट केले.पंचायत मंडळ यापुढेही तीव्र विरोध करील असे सरपंचानी स्पष्ट केले.

प्रारंभी शापोरा नदी बचाव समितीचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर यांनी स्वागत केले. कामुर्ली पंचायतीचे सरपंच विशांत गावकर यांनी आभार मानले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: