गोवा 

‘…आम्हाला आमदार बदलवावा लागला तरी चालेल’

पेडणे (प्रतिनिधी) :
विर्नोडा पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रस्त्याचे काम सुरु असून अजूनपर्यंत सर्विस रस्ता, उड्डाण पूल, गणेश विसर्जन स्थळाला संरक्षण भिंत , पाणी जाण्यासाठी व्यवस्था अजून पर्यंत केली नाही. रस्त्यामुळे विर्नोडा गावचा संपर्क तुटलेला आहे, धोकादायक स्थितीत रस्ता आहे. शिवाय अजूनपर्यंत सर्विस रस्ता केला नाही. अश्या अनेक समस्या आहे आणि ते सरकारसमोर अधिकाऱ्यासमोर आम्ही मांडणार होतो. परंतु उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाउस्कर, रस्ता कंत्राटदार अधिकाऱ्यांना घेऊन २६ रोजी रस्त्याची पाहणी केली, त्यावेळी आम्हाला का अंधारात ठेवले,  असा थेट सवाल  विर्नोडा पंचायतीने पत्रकार परिषदेत करत, जर तीन महिन्याच्या आत जर या समस्या आणि सर्विस रस्ता केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करून वेळप्रसंगी आमदार बदलावा लागेल असा इशारा देण्यात आला. यावेळी खड्डे पडलेल्या जागेत माड झाड लावून सरकार आणि कंत्राटदाराचा निषेध करण्यात आला.

विर्नोडा पंचायत मंडळाने पंचायत कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली त्यावेळी सरपंच मंगलदास किनळेकर, उपसरपंच अपर्णा परब, माजी सरपंच तथा पंच भरत गावडे. माजी सरपंच तथा पंच प्रशांत राव व पंच शैलेंद्र परब आदी उपस्थित होते .

विर्नोडा जंक्शन आणि उड्डाण पूल हि गंभीर समस्या निर्माण झाली आहे , त्यासाठी मागच्या वर्षी पूर्ण गावातील प्रत्येक प्रभागातील नागरिकाना सोबत घेवून हि समस्या सोडवण्यासाठी एक कृती समिती तयार केली होती , शिवाय खास ग्रामसभा  बोलावून उड्डाण पूल , सर्विस रस्त्ये व इतर मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही , तो पर्यंत वेळप्रसंगी  पंचायत  मंडळ सामुदायिक पंचसदस्य म्हणू राजीनामे देण्याचाही इशारा दिला होतो , त्यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद परब यानाहीही आमंत्रित करून हि समस्या मांडळी होती , त्यावेळी उड्डाण पूल उभारणार असे आश्वासन दिले होते , मात्र त्याची आजपर्यंत कार्यवाही नाही .त्याबद्दल आता पंचायातीनेच नाराजी व्यक्त केली आहे .

सरपंच मंगलदास किनळेकर यांनी बोलताना मंत्री अधिकारी येवून रस्त्याची पाहणी करतात आणि आम्हाला पंचायतीला किंवा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या समर्थकानाही कल्पना दिली जात नाही , उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे आम्हाला सहकार्य करत नाही ,रस्त्याविषयी मंत्री अधिकाऱ्यांना घेवून येतात आणि पंचायतीला अंधारात ठेवतात हे योग्य नाही , नागरिकांनी सरपंच या नात्यांनी आम्हाला घेराव घातला व जाब विचारला , आम्ही नागरिकाना सांगितले कि मंत्र्यांनी पंचायतीला कळवले नाही तर मग आम्ही नागरिकाना कसे सांगणार असा सवाल उपस्थित केला .

पंच शैलेंद्र परब यांनी बोलताना या रस्त्याचे तीन वर्षे काम सुरु आहे , त्यामुळे अनेक समस्या आहेत त्या समस्या आम्ही मंत्री आजगावकर व सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर यांच्यासमोर मांडणार होतो . परंतु आम्हाला मंत्र्याने न सांगता परस्पर रस्त्याची पाहणी केली . रस्त्यावरील पाणी थेट पंचायतीकडे येते त्याचा बंदोबस्त करायला हवा , सर्विस रस्ता कसा जाणार याविषयी अजून गावातील पंचायत नागरिक जमीनदार याना अजून माहिती दिलेली नाही . मंत्री रस्त्याची पाहणी करतात तर सरपंचालाच माहित नाही तर आम्हाला कसे करणार असा सवाल उपस्थित केला . समितीमार्फत मुख्यमंत्र्याकडे आम्ही समस्या मांडली  , थोडी सोडली आणि उर्वरित स्थानीक आमदाराने तत्काळ सोडवावी ,अन्यथा नागरिकच त्याना आपली ताकत येत्या निवडणुकीत दाखवतील असे ते म्हणाले .

समितीतर्फे सरकारला निवेदन दिले सरकारकडे समस्या माडली , अजून काहीच दाखल नाही , सर्विस रस्त्याचे अजून काम हाती घेतले नाही , रस्त्याच्या बाजूला जलवाहिनी  गेली त्यावर अजून काही उपाय केलेले नाही , आमचा आमदार आम्हाला डावलतो अस आम्हाला वाटते ,मतदाराना , आणि पंचायत  मंडळाला विश्वासात घेत नाही असा माजी सरपंच तथा पंच प्रशांत राव यांनी दावा करून मालपे रस्त्याची पाहणी आणि समस्या हि पेडणे पालिकेच्या नगरसेवकांना घेवून तो करतो रस्त्या पालिकेच्या हद्दीतून जाताच नाही त्यामुळे मंत्री आजगावकर यांनी अगोदर पंचायतीला विश्वासात घ्यावे अशी मागणी पंच प्रशांत राव यांनी केली.

pedne

उपमुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया :

दरम्यान, याविषयी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता २६ रोजी धारगळ ते पत्रादेवी या रस्त्याची पाहणी केली. त्या दिवशी अचानक सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर याना मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलावल्याने ते धारगळ येथून अर्धवट कामाची पाहणी करून परत गेले. विर्नोडा पत्रादेवी मालपे, न्हयबाग या भागातील रस्त्याविषयी निर्माण झालेल्या समस्या व नागरिकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी परत एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर व अधिकाऱ्यांना घेवून येणार त्यावेळी विर्नोडा भागातील समस्या ऐकून घेतल्या जाईल असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले .
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: