गोवा 

”या’ ठिकाणी पावसाळी पर्यटनाला वाव देण्याची गरज’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
पावसाळी पर्यटनाला अपेक्षित सरकारकडून वाव मिळालेला नाही ,पावसाळ्यात डोंगर माळरानावर निसर्ग निर्मित अनेक आकर्षित स्थळे आहे ,ती शोधण्याची गरज असून त्याचा सरकार पातळीवरून विकास करण्याची गरज आहे ,हे पर्यटन स्थळे मद आणि मदिरा व प्लास्टिक मुक्त केल्यास सर्व साधारण पर्यटक कुटुंबियासहित या ठिकाणी भेटी देऊ शकतात, असे निरीक्षण ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगांवकर यांनी नोंदवले.

असेच आकर्षित धबधबे तुये औद्योगिक वसाहतीच्या मागे आहेत ,शिवाय चिवय येथे एक आकर्षित तळी आहे ,तिचा विकास झाला तर या परिसराला पर्यटनाचा साज चढायला विलंब लागणार नाही ,छोटया मोठया व्यवसायिकांनाही धंदा मिळू शकतो ,त्या दृष्टीने प्रयत्न  पर्यटन खात्याने करावेत अशी मागणी राजन कोरगावकर यांनी केली आहे. तुये मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटरवर हा आकर्षित धबधबा असून अनेक मुले व पर्यटक या धबधब्यावर येऊन पर्यटनाचा आनंद लुटत असतात या ठिकाणी अजून प्लस्टिक कचरा नसल्याने हा परिसर स्वछ आहे .

पावसाळी पर्यटनाला वाव देण्यासाठी ही जागा फार महत्वाची आहे ,शिवाय चिवय येथील पर्यटन स्थळ मुख्य रस्त्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे ,निसर्गाच्या साधिण्यात हा परिसर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत ,मात्र अजून पर्यंत सरकारचे लक्ष पोचलेले नाहीत ,तत्कालीन पंचायत मंत्री राजेंद्र आरलेकर यानी या भागाला भेट देऊन सुशोभीकरण करण्याची योजना आखली होती त्याचा पाठपुरावा झाला नाही.


वर्षांचे 365 दिवस देश विदेशातील पर्यटक येण्यासाठी हरमल येथील परशुराम टेकडीवर भव्य परशुराम पुतळा उभारावा ,परशुराम टेकडीकडे मुरडेश्वर पर्यटन स्थळापेक्षाही कितीतरी पटीने अग्रेसर पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे ,पर्यटन खाते व सरकार आणि परिसरातील जमीनदार स्थानिक पंचायत व्यावसायिक या सर्वांना सामावून घेऊन खाजगी क्षेत्राद्वारे योजना आखता येते आणि पर्यटन क्षेत्रात हरमलचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे सरकारने काम करावे अशी मागणी होत आहे

पर्यटन नकाशावर हरमल गाव व तिथला परिसर पर्यटकांना आजही आकर्षित करीत आहे , नियोजन नसताना बांधकामे केल्याने अनेक अडचणी निर्माण होतात , आजही जगाच्या नकाशावरून आलेला पर्यटक निदान एकदातरी हरमल किनारी भेट देत असतो . परंतु हरमल किनाऱ्याच्या प्रेमांत पडणारे अनेक आहेत ,पर्यटनाला महत्व देणारा हा गाव आजची शाशकीय व पर्यटन खात्याच्या विकासाला भुकेलेला आहे .

आजही या गावाकडे पर्यटनाची क्षमता आहे ,निसर्ग सौदर्य न्याहाळण्यासाठी जगाच्या काना कोपऱ्यातून पर्यटक अभ्यास करण्यासाठी येतात ,चांगल्या बरोबर वाईटही गोष्ठी येतात त्यामुळे पर्यटन व्यवसाय बदनाम होतो ,त्यावर स्थानिक मात करून पर्यटन व्यवसाय करतात . मात्र सरकारच्या कोणत्याच योजना नाही .

mission for local
हरमल गावाला परशुराम भूमी म्हणून पुरातन इतिहास आहे .आजही परशुराम टेकडी आकर्षित आहे भस्माचा डोंगरही म्हणून प्रसिद्ध आहे .त्याच्या बाजूला गोड्या पाण्याचा तलाव वरच्या बाजूला हिरवीगार वनराई ,आणि समोरून फेसाळणारा अरबी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा याचे आकर्षण , आणि लहान मोठी खडप  हे खास पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाने या गावाला सढळ हस्ते उधळण करून पर्यावरणाची कलाकृती निर्माण केली आहे . ऐतिहासिक ,धार्मिक ,पौराणिक ,एकापेक्षा एक सरस अशी स्थळे आहेतच शिवाय सांस्कृतिकदृष्ट्या हा गाव खूप पुढे गेलेला आहे .हरमलच्या किनाऱ्याचा विचार केल्यास अनेक सिने अभिनेते ,निर्माते या गावाच्या प्रेमात पडलेले असतात. स्थानिक व बिगर गोमंतकीय नागरिकांच्या प्रयत्नामुळेच​ गाव खूप विकसित झाला.

‘​परशुरामाचा पुतळा उभारण्याची कल्पना अगोदरपासून’
laxmikant-parsekarमाजी मुख्यमंत्री प्राचार्य ​लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे संपर्क साधला असता आपण मुख्यमंत्री असताना परशुराम टेकडीवर परशुरामाचा पुतळा उभारण्याची कल्पना आपल्या डोक्यात आली होती , परंतु हि जागा खाजगीरीत्या असल्याने सरकारने व खाजगी जमीन ​संबंधितांना विश्वा​सात घेवून प्रकल्प उभारता येतो​. आपण मुख्यमंत्री असताना मिनेजी​स ब्रागां​जा  संस्थेचे चे​अ​रमन संजय हरमलकर यांना घेवून टेकडीची संपूर्ण पाहणी केली ​होती.  हि योजना नंतर लगेच निवडणुकीमुळे बा​र​ळगली​.  ती प्रकिया पुढे न्यायला हवी​.  ​​आपणास परत संधी मतदार देतील असा विश्वास व्यक्त करून आपण या योजनेचा पाठपुरावा करणार असल्याचे त्याने  सांगितले​. ​

​​

​दरम्यान, ​मान्द्रे मतदारसंघात अनेक प्रकल्प मुख्यमंत्री पार्सेकर यांनी आपल्या कल्पनेनुसार ​दूरदृष्टी ठेवून आणले​.  त्यातील नवीन तुये हॉस्पिटल इमारत , चोपडे जंक्शन ,खिंड परिसराचे सुशोभीकरण , आश्वे मिनी पार्किंग प्रकल्प , तुये येथील नियोजित प्रकल्प , खाजन्गुंडो मानसी सुशोभीकरण या प्रकल्पासाठी कुणीही मागणी केली नव्हती मात्र पार्सेकर यांनी या प्रकल्पाना चालना दिली त्यामुळे मतदारसंघात विकास दिसत आहे​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: