सातारा 

‘कृष्णा’साठी झाले 91% मतदान

​कराड (अभयकुमार देशमुख) :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मर्या रेठरे बु ता कराडच्या  संचालक मंडळ निवडणुक 2021 साठी दि. 29 जून रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत सर्व 148 मतदान केंद्रावर  शांततेत मतदान पार पडले. सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला व सकाळी दहा पर्यंत सुमारे 21%, दुपारी 12 पर्यंत 45%, दुपारी 2 पर्यंत 60% , दुपारी 4 पर्यंत 71% व सायं 5 वाजे पर्यंत सुमारे   73% अशा एकूण 47145 मतदारांपैकी सुमारे 34532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 47145 मतदारांपैकी  सुमारे नऊ हजार मतदार मयत असल्याने टक्केवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात हयात मतदार विचारात घेतल्यास सुमारे 91 % मतदान झाले.

सकाळपासूनच  निवडणुक निरिक्षक आर टी शिंदे ,  निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी , संजयकुमार सुद्रिक व जनार्दन शिंदे  यांनी  अनेक मतदान केंद्रावर भेटी देऊन निवडणुक प्रक्रिया निर्भयपणे व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
मतदानावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उप अधिक्षक, कार्यक्षेत्रातील सर्व  पोलिस निरीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिक ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला.  तसेच सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतदान प्रतिनिधींनी शांततेत मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी संयमी भूमिका घेतली. कोविड च्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने निवडणुक यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. परंतु सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः चा जीव धोक्यात असतानाही  कोविड नियमांचे काटेकोर पालन करून मतदान केंद्रावर मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करणेसाठी चोख व्यवस्था केली.
निवडणुकीसाठी  सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नियुक्त केलेल्या सुमारे 1500 कर्मचारी यांनी निवडणूकीचे आवाहन लिलया पेलले. निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर  यांनी याचे संपूर्ण श्रेय निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, चोख बंदोबस्त ठेवणारे  सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी आणि सर्व पॅनेल प्रमुख, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष  कामकाजात मदत केलेले सर्व घटकांना जाते असे सांगितले.

 
मतमोजणी होणार १ रोजी :
​१​ जुलै रोजी कराड येथे वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ​८ वाजल्यापासून 74 टेबलावर  मतमोजणी होणार  असून त्यासाठी सुमारे 325 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी साठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणणेस मनाई असल्याने मोबाईल आणू नये असे आवाहन  निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले आहे​.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: