मुंबई 

बी. शामराव काँग्रेसच्या ‘कल्याण डोंबिवली सरचिटणीसपदी’

कल्याण :
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सक्षम भारत संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक बी. शामराव यांची आज काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन पोटे यांनी पक्ष कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवून सदर पदी नियुक्ती केल्याबद्दल बी. शामराव यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे, राज्य सरचिटणीस मोहन जोशी, विधानपरिषद आमदार संजय दत्त, शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले. काँग्रेसकडे जनता आपला पक्ष म्हणून पाहते, त्यामुळे जनसामान्यांना काँग्रेसबद्दल नेहमीच ममत्व आहे. काँग्रेसच सर्वसामान्यांचा उध्दार करू शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये आहे. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवत, कार्यकर्त्यांसोबत आगामी कल्याण डोंबिवली मनपा निवडणूकीमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू, असा ठाम विश्वास यावेळी बी. शामराव यांनी व्यक्त केला.

करोना काळामध्ये सक्षम भारत आणि स्काय फाउंडेशनच्या माध्यमातून ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील वाडीवस्त्यांपर्यंत जाऊन गरजूंना हरेक प्रकारे बी. शामराव यांनी मदत केली होती. त्यामुळे बी. शामराव यांच्यासारखा ​वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ​एक ​उच्चशिक्षित, ​सच्चा, बुध्दीजिवी आणि तळमळी​च्या​कार्यकर्त्याला जिल्ह्याचे सरचिटणीसपद लाभल्याबद्दल जिल्ह्यातून त्यांचे ​​अभिनंदन होत आहे.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: