गोवा 

आमदार अपात्रता प्रकरणी आता ७ जुलैला सुनावणी

पणजी :
काँग्रेसच्या १० आमदारांनी पक्षाच्या बनावट दस्तावेज वापरून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा काँग्रेसने केला. या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करत नाही. याबाबत पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी न्यायालयाने उत्तर गोवा अधीक्षक आणि पणजी पोलीस निरीक्षकाला नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.

​आमदार चंद्रकांत कवळेकर, मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, मंत्री जेनिफर मॉन्सेरात, आमदार बाबुश मॉन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा या दहा जणांनी १० जुलै २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी ८ ऑगस्ट रोजी सभापती समोर १० बंडोखोर आमदाराविरोधात अपात्र याचिका दाखल केली होती. त्यानंतर २० एप्रिल २०२१ रोजी सभापती राजेश पाटणेकर यांनी अपात्र याचिका फेटाळून लावली.

या निकालाला चोडणकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून सभापतीच्या निवाडाला आव्हान दिलं आहे. दरम्यान या प्रकरणी १० बंडोखोर आमदारांनी काँग्रेस पक्षाचे बनावट दस्तावेज तयार करून भाजप प्रवेश केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर चोडणकर यांनी या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. ती तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे चोडणकर यांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज दाखल करून पोलिसांना गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा निर्देश देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायालायने वरील निर्देश जारी केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: