गोवा 

न्यायालयाने दिला ‘​त्या’ घराबद्दल ‘जैसे थे’चा आदेश

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मांद्रे जुनासवाडा येथील रीवा रेसोर्ट आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा स्थानिक उमावती गडेकर उर्फ मांद्रेकर यांनी करून मामलेदार न्यायालयात मुंडकार कायद्याखाली अर्ज दाखल केला आहे . त्यावर संयुक्त मामलेदार प्रियांका कामत यांच्याशी सुनावणी होवून जैसे थे असा अंतरिम आदेश दिला आहे .

 

उमावती गडेकर यांनी आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला . रीवा रेसोर्ट प्रा. लिमिटेड हॉटेलच्या परिसरात उमावती गडेकर यांचे जुने घर आहे व त्यांच्या घरा संबधात पेडणे मामलेदार येथे मुंडकार कायद्या अंतर्गत अर्ज दाखल केला आहे . दरम्यानच्या काळात रीवा रेसोर्ट याने घरच्या परिसरात बांधकाम करीत आहेत तसेच इतर त्रासदायक अडचणी निर्माण करत आहेत . आपण घर सोडून जावे यासाठी ते त्रास देतात सरकारने आपल्याला संरक्षण द्यावे अशी विनंती तिने न्यायालायाकडे केली आहे .

 

पेडणे संयुक्त मामलेदार यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे . पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे , न्यायालयाच्या आदेशां प्रमाणे आपल्याला तात्पुरता संरक्षण मिळालेले आहे . रीवा रेसोर्ट च्या विरोधात आपण गेल्या दोन वर्षापासून लढत आहोत . आपले कुटुंब जागेतील पुरातन मुंडकार आहोत व रेवा रेसोर्ट ने हल्लीच जमीन विकत घेतली आहे . पाणी वाट व जागेवरून आपला लढा चालूच राहील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: