गोवा 

‘आरजी’ने काढला एक दिवस शेतात

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर) :
रेवोलूशनरी गोवन्सच्या पेडणे तालुका गटाने कोरगाव येथे आज एक अनोखा उपक्रम केला. एक दिस शेतान या उपक्रमाअंतर्गत, यांचा पूर्ण गट चिखलात उतरून त्यांनी भाताची लागवड केली. नवीन पिढीला शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम करत आहेत.

रेवोलूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब आणि सुनयना गावडे हे कोरगावच्या शेतात काम करताना आज दिसले. यावेळी मनोज परब म्हणाले, “शेतात काम करणे एक आनंददायक अनुभव आहे आणि जर गोव्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर कृषी क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. गोव्यात सुपीक जमीन आहे पण ही जमीन काँक्रीटीकरणाने नष्ट होत आहे. एक दिस शेतान या उपक्रमाने आपल्या तरुण पिढीला शेतीशी जोडून, आणि गोव्याची पुनर्बांधणी करण्याचा आमचा हेतू आहे”.

“शेतात काम करणे सोपे नाही परंतु आमचे रेवोलूशनरी गोवन्सचे सदस्य उत्साही आहेत. आपल्या मातीत पाय टाकण्याचा कंटाळा नसतो हे आम्हाला आमच्या तरुण पिढीला दाखवून द्यायचे आहे”,असे मत सुनयना गावडे यांनी व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: