गोवा 

‘झाडांशी मैत्री जोडा, पर्यावरणाची निगा राखा’

पेडणे (प्रतिनिधी) :
झाडांचे महत्व प्रत्येक सजीव प्राणी मात्राशी आहे . झाडाशिवाय कोणते सजीव जीव जिवंत राहू शकत नाही . आपल्या जीवनाशी झाडांचा निगडीत संबध आहे , त्यासाठी प्रत्येकाने झाडांची मैत्री करून पर्यावरणाची निगा राखावी असे आवाहन मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी टेंबवाडा मोरजी येथे मांद्रे भाजपा महिला कार्यकर्त्यामार्फत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान अंतर्गत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी पंच सदस्या सुप्रिया पोके , तृप्ती शेटगावकर , रजनी प्रकाश शिरोडकर ,भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य प्राजक्ता कान्नाईक राज्य भाजपा मोर्चा महिला अध्यक्ष नयनी शेटगावकर , उत्तर गोवा महिला उपाध्यक्ष एकता चोडणकर , भाजपा मांद्रे महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर श्रुती केरकर , मेघा खोत , कल्पन्ना कान्नाईक ,लक्ष्मि शेटगावकर व लक्ष्मि नारोजी आदी उपस्थित होते .

यावेळी महिलांनी सागवान , सुरुची व बदाम झाडांचे रोपण केले.

भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा दीपा तळकर यांनी बोलताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड मोकळ्या जागेत करून आम्हाला आमचा परिसर हरित परिसर बनवायचा आहे ,असे तिने सांगितले .

उत्तर गोवा भाजपा महिला उपाध्यक्षा एकता चोडणकर यांनी मनोगत व्यक्त करताना साधूसंतांनी अनादी काळापासून झाडांचे महत्व आम्हाला पटवून दिले आहे , झाडाना आम्ही आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळायला हवे असे सांगितले .

नयनी शेटगावकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: