सातारा 

बाजारपेठेवरील निर्बंध मागे घेण्याची मागणी

महाबळेश्वर (प्रतिनिधी) :
जिल्हाधिकारी यांनी लाॅकडाउन जाहीर करून बाजारपेठेवर लादलेले निर्बंध मागे घेण्याच्या मागणीसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांची तर मंगळवारी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व नायब तहसिलदार श्रीकांत तिडके यांची भेट घेवुन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात पुन्हा लाॅकडाउन जाहीर केला त्या मुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे या निर्णया मुळे बाजारपेठेतील व्यापारी यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे महाबळेश्वर तालुक्याचा रूग्णवाढीचा दर सर्वात कमी आहे असे असताना इतर तालुक्यांच्या रूग्णवाढीचा फटका महाबळेश्वर तालुक्याला बसत आहे महाबळेश्वर हे शहर पर्यटन स्थळ असुन येथे पर्यटकांची आवक सुरू झाली आहे येथे येणारा पर्यटक हा आपली कोरोना टेस्ट करूनच येत आहे त्याच प्रमाणे त्याच्या कडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र पाहुनच त्यांना महाबळेश्वर येथील हाॅटेल व लाॅज मध्ये प्रवेश दिला जातो त्या मुळे मागील दहा दिवसात हजारो पर्यटक येवुनही महाबळेश्वर येथील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही या सर्व बाबींचा जिल्हा प्रशासन विचार करून बाजार पेठेवरील निर्बंध हटविले पाहीजे व बाजारपेठ सुरू करण्यास परवाणगी दिली पाहीजे या मागणीसाठी सोमवारी येथील व्यापारी प्रतिनिधींचे शिष्ट मंडळाने उपविभागीय अधिकारी संगिता राजापुरकर यांची भेट घेवुन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.

सोमवारी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली तर माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची पालिकेत भेट घेतली या वेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी शहरातील व्यापारी वर्गाच्या व्यथा मांडुन बाजारपेठे वरील निर्बंध हटविण्यात यावेत व बाजारपेठ उघडण्यासा परवाणगी दयावी अशी मागणी केली या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कंुभारदरे , नगरसेवक किसनराव शिंदे , प्रकाश पाटील संदीप साळंुखे रविंद्र कंुभारदरे विशाल तोष्णीवाल अतुल सलागरे महेश कोमटी इरफान शेख असिफ सययद तौफिक पटवेकर महेश गुजर मनोज ताथवडेकर बाळकृष्ण साळंुखे अभिजीत खुरासणे सचिन वागदरे रामदास जाधव संतोष जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.

शिष्टमंडळाने येथील तहसिल कार्यालयात उपस्थित असलेले नायब तहसिलदार श्रीकांत तिडके यांची भेट घेवुन त्यांचे बरोबर चर्चा केली व त्यांनाही महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी यांच्या मागणीचे निवेदन सादर केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: