मुंबई 

”त्या’ विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी’

मुंबई  (अभयकुमार देशमुख) :
मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे केली.

आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न केला त्यावर जयंत पाटील यांनी विरोधी सदस्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला.

आज विधानसभेत बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: