गोवा 

”या’ प्रकल्पामुळे सुटणार राज्यातील प्लास्टिकची  समस्या’

पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​) :
पालिका क्षेत्रात देशातील दुसरा इंधन प्रकल्प येत्या काही दिवसात कार्यरत होणार आहे आणि हा प्रकल्प कार्यरत झाल्यानंतर राज्यातील प्लास्टिक समस्या कायम स्वरूपी सुटणार आहे , या प्रकल्पातून पेडणे पालिकेला कंपनींच्या उत्पन्नातून १ टक्का मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ८ रोजी इंधन प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी दिली

​​

यावेळी मुख्याधिकारी अक्षया आमोणकर ,नगराध्यक्ष उषा नागवेकर , उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर , नगरसेवक विष्णू उर्फ बाप्पा साळगावकर , नगरसेवक शिवराम तुकोजी ,प्रकाश कांबळी , माजी सरपंच उल्हास देसाई , विश्वनाथ तिरोडकर  नगरसेविका राखी कलशावकर आदी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री  बाबू आजगावकर यांनी बोलताना या प्रकल्पाला आपला पूर्ण पाठींबा आहे , प्लास्टिक पासून इंधन तयार करणे हि प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे , त्यामुळे दरदिवशी आवश्यक असलेले टाकावू प्लास्टिक या प्रकल्पात आणावे असे आवाहन करून .या प्रकल्पामुळे किमान ७० रोजगार पालिका क्षेत्रातील युवकाना मिळणार आहे . पालिकेने चांगला प्रकल्प आणला मागच्या चार पाच वर्षापूर्वी काही कारणामुळे तो बंद होता . एकूण १७ कोटी या प्रकल्पावर  इन्वेस्ट करून उभारला .

हा प्रकल्प चालूच रहावा :
पेडणे पालिका आणि सुडाने साडे आठ हजार चौरस मीटर जागा बेंगलोर येथील एरोमेटिक कंपनीला भाडेपट्टीवर दिली , प्लास्टिक पासून इंधन तयार करणारी हि कंपनी , या कंपनीचा पहिला प्रकल्प चेन्नाई येथे आहे आणि दुसरा प्रकल्प गोव्यात तोही पेडणे पालिका क्षेत्रात . या प्रकल्पाचा काय फायद काय तोटे याची माहिती खुद्द पालिका मंडळाला नाही . मागच्या पालिका मंडळाला इंधन प्रकल्प कंपनीनी चेन्नाई येथील प्रकल्पाला भेट देवून अभ्यास दौरा करण्याची ऑफर दिली होती . मात्र पालिका मंडळ गेले नाही .

त्यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी असलेल्या गौतमी परमेकर यांनी स्वता खर्च करून चेन्नाई येथे भेट देवून अभ्यास  केला होता , त्यानंतर तिची बदली झाली , मात्र आज पर्यंत हा प्रकल्प कसा असेल त्याचे फायदे आणि तोटे काय याची पालिकेला माहिती नाहि .पालिकेची जागा परस्पर सूडाला लीजवर देताना पालिकेला विश्वासात घेतले नाही . आता या विषयी पालिकेकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी एरोमेटिक कंपनीच्या अधिकाऱ्यांना अभी ये प्रकल्प बंद नही होना चाहिये अशी सुचना केली .

कचरा प्रकल्पाचे काय ?
इंधन प्रकल्पाअगोदर त्याच्या बाजूला आठ वर्षापूर्वी साडेचार कोटी रुपये खर्च करून गार्बेज प्लांट उभारला , अर्धवट स्थितीत असतानाही पालिका मंत्री फ्रान्सिस देसौझा , आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर , सभापती राजेंद्र आर्लेकर नगराध्यक्ष डॉक्टर वासुदेव देशप्रभू पालिका मंडळ यांच्या उपस्थिती करण्यात आला , तिथल्या यंत्राला गंज आली मात्र आजपर्यंत तो कार्यरत केला नाही. पालिकेचा महसूल आणि रोजगार या प्रकल्पामुळे वाढणार असा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केला . या प्रकल्पाला पाठींबा दिल्यामुळे पालिकेचे आणि पेडणेकरांचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अभिनंदन केले .

जागृत पालिका मंडळ असल्याने मागच्या पालिका मंडळाने उभारलेला आणि पाठपुरावा न केल्याने हा प्रकल्प तसाच होता ,आता त्याला चालना मिळाली .

‘गार्बेज प्लांट आमचा नव्हे’ :
साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारलेला कचरा प्रकल्प का सुरु करण्यात आला नाही असा सवाल पत्रकाराने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना केला असता आज पासून तोहि प्रकल्प कार्यरत  होण्याचा दावा केला असता लगेच एरोमेटिक कंपनीच्या अधिकाऱ्याने हात वर करताना हा प्रकल्प आमचा नव्हे , आमच्याकडे चालवायला दिला तर तोही आम्ही चालवू असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .
या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत येणार.

नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना हा प्रकल्प म्हणजे स्वच्छ भारत या अंतर्गातातील  एक प्रकल्प . प्लास्टिकचे आम्ही व्हीलेवाट लावली जात नव्हती आता ते प्लास्टिक या प्रकल्पातून प्रक्रिया होईल असे सांगून पालिकेच्या सहकार्यातून हा प्रकल्प कार्यरत होणार आहे.

पालिकेला अंधारात ठेवून हा प्रकल्प कार्यरत झाला अशी कुजबुज चालू असतानाच पत्रकारांनी या प्रकल्पाविषयी आणि कराराविषयी माहिती पालिकेकडे आहे का असा सवाल केला असता , नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी सरकार आणि कंपनी यांच्यात करार झाला व उत्पन्नाचा एक टक्का भाग पालिकेला मिळणार असे सांगून कराराची कागदपत्रे पालिकेकडे नसल्याचे सांगितले .

प्लास्टिक जाळू नये , जाळल्याने प्रदूषण होते व त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असतो असे कंपनीचे अधिकारी यांनी सांगितले व प्लास्टिक या प्रकल्पात आणून देण्याचे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: