सातारा 

‘शिवेंद्रराजेंच्या वरदहस्तामुळेच होत आहे पावसात रस्त्याचे पॅचवर्क?’

सातारा (महेश पवार) :
येथील कास रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात तक्रार करून देखील मुजोर कंत्राटदाराने चक्क भर पावसात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू ठेवले होते. हि बाब समजताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी सदर ठिकाणी येऊन हे काम पाडले.

 

दरम्यान, भर पावसात अशा प्रकारे रस्ता दुरुस्त करण्यामागे स्थानिक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाच वरदहस्त आहे, असा आरोप यावेळी सचिन मोहिते यांनी आमदारांचे नाव न घेता केला. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्यानेच कंत्रादारदेखील पावसात अशाप्रकारे काम रेटत असून, या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असून, या सगळ्या कामाची चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे यावेळी मोहिते यांनी ‘राष्ट्रमत’ला सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: