गोवा 

‘पेडण्यात एकही बेरोजगार युवक उरणार नाही’

पेडणे (प्रतिनिधी) :
येणारी विधानसभेची निवडणूक ही बेरोजगारीचा प्रश्न सोडवणारी असणार आहे. जे विविध प्रकल्प होवू घातले आहेत त्यातून जी रोजगाराची निर्मिती होणार आहे त्या सर्व नोकऱ्या पेडणे मतदार संघातील युवकांना मिळणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर मतदार संघातील एकही युवक बेरोजगार उरणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी रविवारी इब्रामपूर येथील श्री सातेरी मंदिर परिसराचा कामाचा शुभारंभ करताना केला.

गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत या मंदिर परिसराचा एक कोटी १० लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे , यावेळी तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर ,इब्रामपूर सरपंच सोनाली इब्रामपूर ,माजी सरपंच सोनाली पवार , चांदेल सरपंच संतोष मळीक , भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , वारखंड सरपंच संजय तुळसकर ,झीलु हळर्णकर , मुख्याध्यापक सुभाष सावंत ,देवस्थान अध्यक्ष गावस ,अभियंते नारायण मयेकर , जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना मंदिरे हि समाज प्रबोधन करणारी सर्व धर्म सर्व समाजाला एकत्रित आणणारी आहे , त्यामुळे एकट्याच्या पैशातून हे मंदिर उभे होत नाही त्याला चारचौघांचा हात लागावा लागतो ,त्याच पद्धतीने सरकार मंदिराना सहकार्य करून विकास करतो असे ते म्हणाले.

निवडणुका जवळ आल्या कि पावसात जशी अळंबी उगवतात त्याच पद्धतीने काहीजण निवडणुका जवळ आल्या कि एकाध्या नागरिकांच्या झोपडीला दोन चार पत्रे घालून देतो आणि आपण त्याला घर बांधून दिले अशी प्रसिद्धी मिळवतो , अश्या खोटी माहिती पुरवणाऱ्या नेत्यांचा जनतेने समाचार घ्यावा , त्याना जाब विचारावी असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.

निवडणुका जवळ आल्या कि काही जण एक दोन घरात चार पोटल्या वाटतात आणि आपले फोटो पेपरमध्ये छापून आंणतात त्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे कि कोरोना काळात पेडणे मतदार संघात तब्बल साडे आठ हजार कुटुंबियाना मोफत सरकारने कडधान्य रेशन वितरीत केले त्याचे कुणी फोटो छापून आणले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. पेडणे तालुक्याक़्त होवू घातलेल्या प्रकल्पातून पेडणे मतदार संघातील नागरिकाना रोजगारांच्या संधी मिळणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: