सातारा 

‘त्या’ कर्मचाऱ्यांना कोविड काळात 50% जादा मानधन  

सातारा (महेश पवार) :

श्री बालाजी ट्रस्ट च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून उभारलेल्या संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत कोरोना काळात अंत्यसंस्कार साठी प्रचंड प्रमाणात कोविड व नॉनकोविड चे मृतदेह येत आहेत.त्या मुळे स्मशानभूमीतील कर्मचारी यांचेवर प्रचंड ताण येत आहे. यासाठी येथील कर्मचारी जीवावर उदार होऊन अंत्यत प्रामाणिकपणे सतर्क राहून लोकांना नम्रपणे सेवा देत आहेत.

या साठी या सर्व कर्मचाऱ्यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने लसीकरण केले आहे आहे,तसेच त्या सर्वांना सुरक्षतेसाठी सर्व सुविधा बालाजी ट्रस्ट तर्फे पुरविण्यात येत आहेत. परंतु त्यांचे योगदान पहाता या कर्मचारी यांना कोविड च्या काळात 50% पगारा व्यतिरिक्त ज्यादा मानधन देणेस कर्तव्य म्हणून श्री बालाजी ट्रस्ट तर्फे सुरवात केली आहे.

कैलास स्मशानभूमीला 18 वर्ष पूर्ण झाली असून आज पर्यंत 24300 अंत्यसंस्कार या ठिकाणी केले असून कोविड चे 2950 अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नॉनकोविडंचे अंत्यसंस्कार हे शेणीत केले जातात त्या मुळे आजपर्यंत 30 हजार झाडं वाचली असून बचत गटाच्या 111 महिलांना सुध्दा रोजगार उपलब्ध झाला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: