गोवा 

अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात आगमन

पणजीः
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसंच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते तसंच कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यासाठी अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
​दुपारी 2.30 च्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांचं गोवा विमानतळावर आगमन झालं आहे. आज संध्याकाळी ते पणजी येऊन ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर बुधवारी ते पत्रकारांशी तसंच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

​​‘आप’ने दहा दिवसांपूर्वी ‘चला, गोव्यातील राजकारण स्वच्छ करूया’ ही मोहीम सुरू केली आहे. भाजप आणि काँग्रेस गोमंतकीयांच्या भावनांशी खेळत आहेत असा आरोप ‘आप’ने केला आहे. विकासाच्या नावाखाली फसवणूक आणि खोटी आश्वासने जनतेच्या पदरात पडत आहेत, असंही ‘आप’चं म्हणणं आहे.

 

आमदारांची खरेदी-विक्री करणाऱ्या राजकी​​य पक्षांची मक्तेदारी आता खूप झाली. घाणेरडे राजकारण आता थांबवावं लागेल. गोव्याला विकास हवा आहे. गोव्यात निधीची कमतरता नाही, फक्त प्रामाणिक हेतूची कमतरता आहे. गोव्याला प्रामाणिक राजकारण हवं आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करताना म्हटलंय.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: