गोवा 

‘मनुष्यबळ महामंडळाकडून साडेचार हजार रोजगार निर्मिती’

पणजी :
गोमंतकीय युवकही कष्टाचे समजले जाणारे करु शकतो याची जाणीव सरकारला आहे. याचमुळे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून अडीच हजार जणांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीची हमी देत काम करण्याची संधी सरकारनेच उपलब्ध केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याची ही संधी आजवर इतर राज्यातून येऊन घेतली जात असे. ती संधी गोमंतकीयांनाच मिळावी असा सरकारने विचार केला आणि महामंडळाच्या माध्यमातून ही सेवा देणे सुरु केले. त्यासाठी पोलिस प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणाची सोय केली. त्या माध्यमातून आज अडीच हजार जणांना रोजगार मिळाला आहे. गरज निर्माण झाल्यावर या संधीतही वाढ होणार आहे. गोमंतकीय तरुण तरुणी हे काम करणार नाही, ते करणार नाही असे सांगणारे अनेकजण आहेत पण त्यांच्या हातांना योग्य असे काम देणारे कोणी नाही. त्यांच्या हाताला सरकारने आता काम दिले आहे. हाऊसकिपिंग अॅटेंडेंट म्हणून २ हजार जण काम करतात. म्हणजे सरळपणे साडेचार हजार जणांच्या रोजगाराचा प्रश्न सरकारने सोडवला आहे.
या महामंडळाची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात झाली तेव्हा मी त्या महामंडळाचा संचालक होतो. असे महामंडळ अस्तित्वात आणून गोमंतकीय तरुण तरुणींना रोजगाराची संधी देण्याची संकल्पना मीच स्व. पर्रीकर यांच्याकडे मांडली होती. परप्रांतीय येथे येऊन ही कामे कंत्राटी पद्धतीने करत होते. आता गोमंतकीय तरुण तरुणींना कायम नोकरीच्या माध्यमातून या कामांतून रोजगार मिळाला आहे. सरकारचा तीन वर्षे हा कालावधी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कमी असला तरी बहुतांश प्रश्न सोडवण्यासाठी पावले सरकारने टाकली आहेत, असे त्यांनी नमूद केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: