गोवा 

या मोकाट गुरांवर पालिका कारवाई करणार का?

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मोरजी पंचायत क्षेत्रातील पाळीव जनावरे मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर न सोडता ती आपल्या गोठ्यात बांधावीत ,रस्त्यावर जनावरे दिसली तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा मोरजी पंचायतीने दिला आहे. या विषयी १४ रोजी मोरजी पंचायतीने पूर्ण गावात ध्वनीप्रक्षेपण द्वारे जनजागृती आणि नागरिकाना आवाहन केले.

या विषयी सरपंच वैशाली शेटगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता अनेक नागरिकांच्या वाहनचालकांच्या तक्रारी असतात हि कि मोकाट गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात त्यामुळे वाहने चालवणे अंत्यत कठीण असते , शिवाय हि जनावरे शेतात बागायतीत जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात , पाळीव जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे आपापल्या गोठ्यात बांधावी अन्यथा योग्य ती कारवाई करण्यासाठी पाऊले उचल्याचे सरपंच वैशाली शेटगावकर यांनी सांगितले.

भाडेपट्टीवर गोठा :
मोरजी पंचायतीने वरचावाडा येथे एक भाडेपट्टीवर गोठा मागच्या ७ वर्षापूर्वी  घेतला आहे , शिवाय मोकाट गुरे पकडण्यासाठी एका मजुराची नेमणूक केली होती. मात्र आजपर्यंत त्या गोठ्यात रस्त्यावरील एकही जनावर बांधले गेले नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हमरस्त्यावरील सर्व जनावरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश पंचायत आणि पालिका क्षेत्राला दिलेला आहे , त्यासाठी सरकारकडून  प्रत्येक पंचायत आणि पालिकेला कोंडवाडे उभारण्यासाठी खास निधीची तरतूद केली , शिवाय गुरांची राखण देखभाल  करण्यासाठी कामगाराची नियुक्ती करण्यासाठी खास निधी पंचायत आणि पालिकेला सरकारकडून मिळतो . या सर्व योजना असतानाही कोणत्याच पंचायती व पालिका गुरावर कारवाई करत नसल्याचे चित्र दिसते .
समजा गुरे पकडली तर त्याला चारा पाणी त्याची निगा कोण राखणार हि समस्या पंचायतीकडे असल्याने गुरावर कारवाईची अंमलबजावणी होत नाही.

गोठ्यांचे घरात बंगल्यात रुपांतर :
मोरजी पंचायत क्षेत्रात पूर्वी मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे होती , ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडे किमान तीनचार पाळीव गुरे त्यात गाय , बैल . म्हैस रेडा , यांचा समावेश होता , शेती नांगरण्यासाठी बैलाचे जोत होते ,त्यातून पारंपारिक पद्धतीने शेती केली जायची . किमान ३०० शेतकऱ्या पेक्षा जास्त  शेतकऱ्यांकडे किमान एका बैलाची जोडी होती , त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरा शेजारीच एक जनावरांचा गोठा असायचा , काहीचे माळरानावर खास जागेत गोठे होते , हे गोठे आता इतिहास जमा झाले आहेत , पूर्वी हे गोठे कौलारू किंवा माडाच्या झापळ्याचे छप्पर अस्यायचे , आता ते त्या गोठ्यांची जागा घरे , बंगले इमारती यांनी व्यापलेली आहे , त्यामुळे गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: