सातारा 

शिवेंद्रराजें, उदयनराजेंना शिवसेनेचे रोकडे प्रश्न

सातारा (महेश पवार) :

नगरपालिका निवडणूक जशी जशी जवळ येत चालली तसं तसे आरोप प्रत्यारोपाची  मालिका सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घंटागाडी मुळेतरी सातारा नगरपालिका आहे असे वाटते, असा टोला लगावला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी थेट नगरपालिका घंटागाड्यांची सद्यस्थिती समोर आणली. पालिकेने खरेदी केलेल्या गाड्यांचे टायर गायब झाले. तर कुठे टायरच्या तारा निघाल्या आहेत. तर गाडीचा नंबर सोडा साध्या गाडीला नंबरप्लेट नाहीत. अवघ्या एका वर्षात या गाड्यांची दुरावस्था झाली आहे. त्यातच जर यातील एखाद्या गाडीचा अपघात झाला आणि हिट ॲन्ड रन सारखे एखादे प्रकरण घडले तर या सगळ्याला  जबाबदार कोण? यांचं उत्तर अधिकारी आणि निवडून दिलेल्या नेत्यांकडे आहे का? असे रोकडे प्रश्न शिवेंद्रराजें, उदयनराजें यांचे नाव न घेता सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्या या दोन्ही नेत्यांना सचिन मोहिते यांनी विचारला आहे.

पालिकेतील आरोप प्रत्यारोपच्या मनोरंजनास सातारा शहरातील जनता आता भुलणार नाही. त्यामुळे या पुढच्या काळात शिवसेना अशा प्रकारे जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊन देणार नाही, असे आश्वासन यावेळी मोहिते यांनी दिले.

या वेळी शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, सामजिक कार्यकर्ते प्रणव सावंत, उपशहरप्रमुख अभिजित सपकाळ, युवा सेना कार्यकर्ते अक्षय जमदाडे उपस्थित होते.

सातारा ​आरटीओ, पोलीस ​यावर कारवाई करणार का?
शहरात एखादे वाहन विना नंबरप्लेट एखादवेळेस दिसले तर त्वरित त्याच्यावर कारवाई करणारे पोलीस आणि आरटीओ यांच्या नजरेला गेल्या सव्वा वर्षांपासून या विना नंबरप्लेट संपूर्ण शहरात फिरणाऱ्या १७ घंटागाड्या अजून दृष्टीस पडल्या नाहीत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या सगळ्या कारभारात पोलीस आणि आरटीओच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले असून, शिवसेनेने हा प्रश्न समोर आणल्यानंतर आता तरी पोलीस आणि आरटीओ पालिकेवर आणि या १७ वाहनांच्या कंत्राटदारावर कारवाई करणार का? अशी विचारणा होत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: