गोवा 

कोरगाव सरपंचपदी उमा साळगावकर

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
कोरगाव सरपंचपदी उमा साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच स्वाती गवंडी यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आज पंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत उमा साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रमिला देसाई ,अब्दुल नाईक ,उदय पालयेकरकुस्तान कुऍलो  आदी पंच सदस्य उपस्थित होते.

भाजप समर्थक आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कट्टर समर्थक असलेल्या कोरगावच्या सरपंचा स्वाती गवंडी यांच्यावर  १० मे रोजी आठ पंचसदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटिस पेडणे तालुका गटविकास कार्यालयात दिली. होती त्यावर चर्चा होऊन तो मंजूरही झाला होता.

सरपंच स्वाती गवंडी यांच्यावर कोरगाव पंचायतीच्या  नऊ पैंकी आठ पंचसदस्याच्या या नोटीसीवर सह्या होत्या. उमा साळगावकर, अब्दुल नाईक, प्रमिला देसाई, महादेव पालयेकर, उदय पालयेकर, समील भाटलेकर , वसंत देसाई व कुस्तान कुयेलो या आठजणांच्या सह्या आहेत. या अविश्वास ठराव नोटीसमध्ये सरपंच ह्या  पंचायत वार्डाच्या विकासात लक्ष घालत नाही. सदस्यांच्या  प्रश्नांना  योग्य प्रकारे उत्तरे देत नाहीत. पंचसदस्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र निर्णय घेतात. पंचायतीच्या कामात सहकार्य करत नाही अशी कारणे या नोटीसमध्ये नमूद केली होती ,हे सर्व आरोप त्यावेळी सरपंच असलेल्या स्वाती गवंडी यांनी नाकारल्या होत्या

कोरगावच्या सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहे एकूण नऊ पंचसदस्य असलेल्या  पंचायतीमध्ये उपमुख्यमंञी यांच्या सोबत बैठक होऊन पाच वर्षे पैंकी अडिच वर्षे सुरुवातीला प्रमिला देसाई तर नंतरची अडिच वर्षे स्वाती गवंडी यांना सरपंचपद देण्याचे अलिखित करारानुसार ठरले होते. तर उपसरपंचपद हे पुरुष चार पंचसदस्यांना ठराविक काळासाठी विभागून घेण्याचे ठरले होते. त्यानुसार आतापर्यंत सर्व सुरळीत सुरु होते. पण  स्वाती गवंडी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच अविश्वास ठराव दाखल केला होता.

विधानसभा निवडणूकीसाठी पेडणे मतदारसंघात सध्या संभाव्य उमेदवारांनी जोमाने काम करायला सुरुवात केली असून पेडणे मतदारसंघातील सर्वात मोठी असलेली कोरगाव पंचायत क्षेत्रात  सध्या सर्वांचे लक्ष लागून असून या पंचायत क्षेत्रात तसेच मतदारसंघात मिशन फाॕर लोकलच्या बॕनर्र खाली राजन कोरगावकर हे करत असून कोरगाव पंचायतीचे माजी पंचसदस्य तथा हरमल  जिल्हा पंचायत सदस्य म्हणून अपक्ष निवाडून आलेले  रंगनाथ कलशावकर , माजी सरपंच उल्हास देसाई, पंच वसंत देसाई हेही राजन कोरगावकर हे निर्जंतुकीकरण करताना  त्यांच्या सोबत अधून मधून फोटोत दिसतात. तर काही पंचसदस्य मगोपक्षाचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कोरगाव पंचायतीचे नऊ पंचसदस्य हे उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचे समर्थक होते.माञ गेल्या काही दिवसांपासून काही पंचसदस्य मशीन फाॕर लोकलचे संभाव्य उमेदवार राजन कोरगावकर यांच्या संपर्कात आणि त्यांच्या सोबत कोरोना संकटात फिरत असल्याने पेडणे मतदारसंघात याबाबत बरीच चर्चा झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून स्वाती गवंडी यांना पद सोडावे लागले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: