गोवा 

‘नम्रताला करणार उच्च शिक्षणासाठी मदत’

पेडणे (प्रतिनिधी) :

पार्से हायस्कुल, पार्सेची विद्यार्थिनी नम्रता अशोक साळगावकर ९६ टक्के गुण मिळवून नुकत्याच जाहीर झालेल्या १० वीच्या परीक्षेत पेडणे तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते दीपक कलांगुटकर यांनी तिच्या घरी जावून तिचे अभिनंदन केले. यावेळी दीपक कलांगुटकर यांनी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले.

नम्रता हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.तिने कुठेही अतिरिक्त शिकवणी घेतलेली नाही केवळ पार्से हायस्कूलच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनातून तिने हे यश मिळवले आहे .

यावेळी कलांगुटकर यांच्या सोबत पार्से पंचायतीचे पंच अरुण पार्सेकर,निलेश कलांगुटकर,महेश कांबळी,स्नेहल पार्सेकर,आदी उपस्थित होते.
नम्रता ही आपल्या आई,तसेच आजी बरोबर लहानशा घरात राहते तिचे वडील हयात नाहीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे व शिक्षकांचे  सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: