गोवा 

पेडणे शहरात वाहतूक कोंडी

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे . वाहतूक पोलीस ट्राफिक मात्र रस्त्याच्या आडोशाला राहून जे कुणी वाहतूक नियम भंग करतात त्यांच्यावर कारवाई करतात , मात्र वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनावर कारवाई केली जात नाही त्या बद्दल नागरिक अमर शेट्ये व नामदेव नाईक आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

पेडणे शहरात नो पार्किंगच्या जागेत वाहने पार्क केली जातात. नो एन्ट्री मधूनही चालक वाहने घेवून प्रवेश करतात. शिवाय अधिकाधिक वाहने रस्त्यावरच पार्क करून वाहनचालक आपल्या कामाला जातात .

रस्त्यावर नो पर्किंच्या ठिकाणी आणि वळणावर वाहने पार्क करीत असल्यामुळे अधूनमधून वाहतुकीची कोंडी होते .

१६ रोजी दुपारी पेडणे पालिकेच्या इमारतीसमोर वळणावर कदंब बसला वळण घेताना बरीच कसरत करावी लागली . वळणावरच एका वाहनचालकाने आपली चारचाकी वाहन पार्क करून कुठे तरी गेला होता , तर दुसऱ्या बाजूने नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करून ठेवले होते , या ठिकाणी ट्राफिक पोलीस होता त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले . त्यामुळे हा प्रकार घडला , शहरातील अगोदरच रस्त्ये अरुंद आहेत आणि त्यात भर म्हणजे दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात .

पेडणे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जे पोर्तुगीज कालीन अरुंद रस्ते होते त्यावरच आतापर्यंतच्या सरकारने डागडुजी केली ,ते रुंद करण्याच्या भानगडीत कोणतेच सरकार पडले नाही , जमीनदारांच्या आडकाठी मुळे  हे अरुंद रस्त्याचे रुंदीकरण थांबले .अगोदरच अरुंद रस्ते त्यात वाहनधारकांची  अरेरावी ,रस्त्यावर मधेच वाहने ठेवून कुठे तरी गायब होणे आणि त्यानंतर मात्र ट्राफिक पोलीस धावपळ करतात वाहनचालक रस्त्यावर वाहन ठेवून गेलेला  असतो

पेडणे पालिका क्षेत्रातील पौर्तुगीज काळातील जे अरुंद रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या रुंदीकरणाला व्यवस्थित वाव मिळाला नाही , रस्त्याच्या बाजूला जी बाजारपेठेतील जी दुकाने आहेत त्या दुकान व्यावसायीकानी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटलेली आहे , आठवड्याचा बाजार आजही रस्त्यावर भरवला जातो , त्यामुळे मुख्य रस्त्यावरील सर्वप्रकारची वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवली जाते ,परिणामी पेडणे बसस्थानक ते पेडणे पालिका इमारत पर्यंत दोन्ही बाजूने वाहने पार्क केली जातात शिवाय रेषा माशेलकर  गार्डन परिसरातील दोन्ही बाजूने पार्किंगसाठी हरकत असतानाही वाहने पार्क केली जातात , या वाहनावर पोलीस ट्राफिक कारवाई करू शकत नाही , शहरात पर्यायी पार्किंग व्यवस्था नसल्याने  हि समस्या दिवसेंदिवस वाढत आहे यावर एकाच उपाय म्हणजे बसस्थानक प्रकल्पातील पार्किंग जागा खुली करावी लागेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: