गोवा 

‘फुटिरतेला प्रोत्साहन देणे व घोडबाजार करण्याचे भाजपचे धोरण उघड’

पणजी :
गोवा विधानसभेच्या आगामी सत्रात पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करुन पक्षांतरास कायमचा पुर्णविराम द्यावा अशी मागणी करणारा ठराव मी दाखल केला होता. घटनेच्या दहाव्या परिशीष्टात आवश्यक बदल करण्यास केंद्र सरकारकडे मागणी करणारा सदर ठराव आज विधीमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत नसल्याने सदर ठराव दाखल करुन घेण्याचे सौजन्य या सरकारने दाखवले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप सरकार पक्षांतरे व घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचेच या कृतीतुन स्पष्ट झाल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

 

गोव्यातील सर्व आमदारांनी माझ्या ठरावास एकमताने पाठींबा द्यावा व माजी मंत्री तथा घटनातज्ञ स्व. काशिनाथ जल्मी यांची पक्षांतरे कायमची बंद करण्याची आकांशापुर्ती करावी असे आवाहन मी केले होते. सन १९९० मध्ये त्यानी दिलेला ऐतिहासीक निवाडा सर्वोच्च न्यायालयानेही उचलुन धरला होता याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली आहे. आज पक्षांतराच्या विरूद्ध क्रांतिकारी पाऊल उचलण्याची वेळ आलेली असताना भाजप मात्र त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहे असा गंभीर आरोप दिगंबर कामत यांनी केला.

 

घटनेच्या दहाव्या परिशीष्टात आवश्यक बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणारा ठराव अडवुन ठेवण्याच्या भाजप सरकारच्या कृतीचा मी निषेध करतो. आज संसदेत भाजपकडे बहूमत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक व प्रभावी करणे गरजेचे आहे व भाजपने त्यावर त्वरित कृती करावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.

 

भाजपने देशात फोडाफोडीचे व पक्षांतराचे राजकारण करुन मणिपूर, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश येथे गैरमार्गाने सरकारे स्थापन केली. महाराष्ट्र व राजस्थानातही त्यांनी असाच अयशस्वी प्रयोग केला. गोमंतकीयांनी या भ्रष्ट भाजपला येत्या निवडणूकीत धडा शिकवावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: