गोवा 

”या’ जनावरांपासून आम्हाला दिलासा कोण देणार ?’

पेडणे (प्रतिनिधी) :
राज्यातील युवक शेती व्यवसायाकडे वळत आहेत , शेतातील मातीत हात घालून मोत्यासारखी कणसे पिकवतात. पण उत्पन्न घेण्याअगोदरच रानटी जनावरे शेतीची नुकसानी करतात आणि तुटपुंजी भरपाई मिळवण्यासाठी त्याची कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी आणि आणण्यासाठी प्रवास खर्चात खर्च होतो , त्याला जबाबदार कोण असा सवाल युवा शेतकरी सरकारला उपस्थित करत आहे .

सरकार मग तो राज्य असो किंवा केंद्र सरकार ,दोन्ही सरकारच्या कृषी खात्याकडून भरपूर योजना शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत , ज्याची शेत जमीन आहे ते संबधित युवा शेतकरी या योजनांकडे आकर्षित होवून सरकारच्या माध्यमातून शेतीला प्राधान्य देतात , पदरी शिक्षण आहे म्हणून नोकरी मिळत नाही तोपर्यंत बेरोजगार राहणे परवडत नाही , म्हणून उच्च शिक्षित युवक शेतीकडे वळत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे .रात्रंदिवस मेहनत घेवून काबाडकष्ट करून शेती , केली जाते . मात्र ऐन पिक उत्पन्न घेण्याच्या काळात रानटी गवे येवून हि शेती भाजीपाला फस्त करतात , त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी युवा शिक्षित शेतकरी साहिल नारूलकर यांनी केली आहे .

हाळी चांदेल तेथे रहिवासी युवा महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या साहिल नारुलकर यांनी कोरोनाच्या काळात शेती व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी शेती हा विषय निवडला पूर्वजात असलेल्या दीड हजार चौरस फूट जागेत काकडी आणि भेंडी लागवड केली होती. आणि या शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करून शेती फुलवली  होती  .पीक तोडणीस येत असताना गव्या रेड्याने हैदोस घातला त्यामुळे  भेंडी लागवडीचे मोठे नुकसान झाले .

नारूलकर यांनी प्रतिक्रिया देताना  सरकार वारंवार युवकांना शेतीकडे वळण्याचे आवाहन करत आहेत. कृषिक्षेत्रात वाढ व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना अमलात आणत आहेत. पण रानटी जनावरांनी केलेल्या नुकसानाकडे सरकार डोळेझाक करत असल्याचे दिसते. नुकसान भरपाई म्हणून सरकार शेतकऱ्यांना मदत करतो खरा पण ती रक्कम नुकसानभरपाईचे कागदपत्र आणि वाट खर्चास जाते. योजना आणल्या म्हणून कृषी विभाग  खरंच प्रगत होणार का? पेडण्यात राज्य प्राणीच शेतकऱ्यांच्या पोटावर घाव करत आहेत. सरकारने नवीन योजना काढण्याआधी या प्राण्याचा निकाल लावावा. अशी त्यांनी मागणी केली आहे .

दरम्यान १५ रोजी या भागाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या नैतृत्वाखाली पेडणे मतदारसंघासाठी किसान मोर्चा समितीची निवड केली आहे . या समितीने अगोदर शेतकऱ्याच्या मुलभूत गरजा काय आहेत त्याचा अभ्यास करावा , सरकारी योजनासाठी ज्या अडचणी येतात त्या सोडवायला हव्यात , ज्या शेतकऱ्यांची नुकसानी होते त्याना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काम करायला हवे असे मत शेतकरी व्यक्त  करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: