गोवा 

सीईटीच्या विद्यार्थ्यांना जीत आरोलकरांचा मदतीचा हात 

पेडणे (प्रतिनिधी) :
मांद्रे मतदारसंघाचे मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांच्याकडून मांद्रे मतदार संघातील जनतेला यापूर्वीच डिजिटल सेवा कार्यान्वित केली आहे , आता नुकताच शालांत परीक्षेचा निकाल लागलेला आहे , त्यात दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाना , जे विद्यार्थी दहावी नंतर डिप्लोमा किंवा विद्यान शाखेत प्रवेश घेणार आहे , त्यासाठी विधार्थ्याना अगोदर सिईटी परीक्षा द्यावी लागणार आहे , त्यासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे, इन्ट्रन्स परीक्षा ऑनलाईन देण्यासाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करायची आहे , ती सेवा मोफत मांद्रे मगोच्या कार्यालयात उपलब्ध आहे , १८ जुलैपर्यंत हि नाव नोंदणी सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरु असणार आहे, अशी माहिती जीत आरोलकर यांनी दिली आहे.
मांद्रे मतदारसंघातील जे विद्यार्थी गरीब आहे, अशा गरजवंत विद्यार्थ्यांनी कार्यालयात येऊन या योजनेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचे जे काही प्रवेश शुल्क असेल ते जीत आरोलकर भरणार आहे असे कळवण्यात आले. 

मान्द्रेत मोफत व्हायफाय :
मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मान्द्रे मतदार संघातील ग्रामीण भागात अनेक विध्यार्थ्यांकडे मोबाईल नाही , इन्टरनेट सेवा नाही , इन्टरनेट नसल्याने विध्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाला मुकावे लागते , प्रत्येक ग्राम पातळीवर पंचायतीने जागा उपलब्ध करून दिली तर विध्यार्थ्यासाठी एकत्रित बसण्याची सोय व मोफत व्हायफाय इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा जीत आरोलकर यांनी केली .
दरम्यान मांद्रे मतदारसंघातील सर्व गरजू नागरिकांना सरकारची सर्व  जे ऑनलाईन कागदपत्रे विविध कामासाठी लागतात , ती या पुढे आपल्या मांद्रे कार्यालयातून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी सांगितले.

सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक जी सरकारी कागदपत्रे, त्यात शेतकऱ्यासाठी लागणारा एक चौदाचा , उतारा . बेरोजगार युवकांसाठी रोजगार नोंदणी व विविध कामानिमित्ताने सरकारी कागद पत्रे आता ऑनलाईन सेवा सुरु केली आहे.  त्यासाठी सर्वसामान्य जनतेची हि कागदपत्रे मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते.  ती सोय आता मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मगो पक्षाच्या वतीने मांद्रे कार्यालयात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती जीत आरोलकर यांनी केली आहे.

जीत आरोलकर यांनी बोलताना सरकारने महत्वाची कागदपत्रे आता ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे ती  जे आमची असुशिक्षित शेतकरी आहे त्याना ती मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात. या सर्व अडचणी लक्षात घेवून हि सुविधा आपल्या कार्यालयातून उपलब्ध  तीही मोफत दिली जाईल असे जीत आरोलकर यांनी सांगितले.

वेळप्रसंगी घरपोच सेवा
काहि नागरिकांना जर कार्यालयात येण्याच्या अडचणी असतील किंवा त्यांनी आम्हाला आपल्याला कोणती कागदपत्रे हवीत ती कळवली त्या संबधी माहिती दिली तरीही आम्ही कागदपत्रे संबधित नागरिकांच्या घरपोच करू शकतो.  ज्याना यायला शक्य नाही अश्या नागरिकांसाठी हा उपक्रम असल्याचे जीत आरोलकर यांनी सांगितले .

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी पुढे बोलताना सध्या कोरोना महामारीचा काळ आहे प्रत्येकाने आपापली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी , या काळात मांद्रे उदर्गत आणि मगो तर्फे माद्रे मतदार संघात  विविध योजना , उपक्रम राबवले जात आहेत . सरकार आपल्या पद्धतीने योजना राबवतो त्या योजना ज्या मतदारांनी विश्वास ठेवून लोकप्रतिनिधित्व दिले ते मात्र मतांची गणिते जोडण्यासाठी आपल्याच समर्थकाना लाभ मिळवून देतात , मात्र आम्हाला या योजना राबवताना कोणतेही राजकारण करायचे नाही.  काही लोकप्रतिनिधी पेडणेकरांच्या मतावर मोठे झाले तेच प्रतिनिधी आपल्या भाषणात केवळ आपण जनतेचा नोकर आणि सेवक असेल अशी भाषणे करतो , कृतीतून कधी वागत नाही, असा दावा जीत आरोलकर यांनी केला .

मांद्रे मतदारसंघात आजही पाण्याची समस्या आहे त्यावर अजूनपर्यंत उपाय योजना केली नाही , तुये येथील नियोजित पाणी प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे , मान्द्रेतील अनेक रस्ते पाण्याखाली जातात  रस्त्यांच्या बाजूची गटार व्यवस्था कोलमडली आहे , त्यावर पाऊस तोंडावर येवून सुधा उपाय योजना न केल्याने जीत आरोलकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: