सातारा 

माजी आमदार सदाभाऊ रमले शेतीमध्ये 

मेढा (प्रतिनिधी) :
जावली तालुक्याचे माजी आमदार सध्या काय करतात हा प्रश्न जावलीत उत्सुकतेला गेला आहे . जावलीचे माजी आमदार सदाभाऊ सध्या आपल्या चोरांबे यामुळ गावी पावसाने उघडीप दिली असल्यामुळे घरच्या शेतीमध्ये भात लागणासाठी औत धरुन शेतीमध्ये मग्न असल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सदाभाऊच्या या शेतीविषय आवडीमुळे जावलीत चर्चा रंगू लागल्या आहेत.

जावलीत सदाशिव सपकाळ शिवसेनेकडून निवडून आलेले एकमेव आमदार होते. सदाभाऊचा राजकीय व्यासंग जेवढा मोठा आहे तसा त्याच्या व्यक्तिगत जीवनात शेतील अन्यनसाधारण महत्व राहिले आहे . सर्वसामान्य माथाडी कामगाराचा सुपुत्र असलेले सदाशिव सपकाळ शेती त्याच्या रक्तात आहे .

सध्या लाॅकडाऊन सुरु आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव डोकेदुखी झाला आहे . मात्र जावलीत माजी आमदार मात्र भात शेती करण्यात मग्न असल्यामुळे जावलीचे माजी आमदार सध्या काय करतात या प्रश्नाला भात शेती हेच उत्तर सध्या त्याच्या भातलागण कृतीतुन दिसुन आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: