क्रीडा-अर्थमत

​लस घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदरात घट

स्टार हेल्थचा अहवाल झाला प्रसिद्ध

मुंबई :
लसीकरणाचा परिणाम जाणून घेण्यासाठी कोविड- 19 रुग्णांत करण्यात आलेल्या अशाप्रकारच्या पहिल्याच अभ्यास अहवालात स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या, स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने 45 वर्ष आणि त्यापुढील व्यक्तींना दिलेल्या लसीकरणाचे परिणाम जाहीर केले आहेत. या अहवालानुसार लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या रुग्णांच्या एकूण हॉस्पिटल खर्चात 24 टक्क्यांची घट झाली आहे, तर सरासरी वास्तव्य कालावधीत 2.1 दिवसाची घट झाली आहे. आयसीयूच्या आवश्यकतेमध्ये 66 टक्क्यांची घट झाली आहे, तर मृत्यूदरामध्ये अंदाजे 81 टक्क्यांची कपात झाली आहे.

 

हा अभ्यास अहवाल दुसऱ्या लाटेच्या दरम्यान (मार्च आणि एप्रिल 2021) करण्यात आला असून त्यासाठी देशभरातील 45 वर्ष व त्यापुढे वय असलेल्या 3820 रुग्णांची माहिती घेण्यात आली होती. या सामूहिक प्रकारच्या अभ्यासानुसार लस न घेतलेल्या समूहाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा खर्च सरासरी 2.77 लाख रुपये आला, तर लसीकरण झालेल्या समूहाचा हाच खर्च सरासरी 2.1 लाख रुपये होता. खर्चातील ही कपात लसीकरण झालेल्या समूहाची आयसीयूची आवश्यकता कमी झाल्यामुळे तसेच हॉस्पिटलमध्ये राहाण्याचा कालावधी 7 दिवसांवरून 4.9 दिवसांवर आल्याने झाली आहे.

या अभ्यास अहवालाविषयी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस. प्रकाश म्हणाले, ‘2021 च्या सुरुवातीला कोविड- 19 वर शोधली गेलेली लस ही आजवरची सर्वाधिक वेगाने शोधली गेलेली लस आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर या 14 दिवसांत या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये लस न घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत कोविड- 19 लसीकरणाचा नेमका परिणाम मोजणे व जाणून घेणे हे  आमचे उद्दिष्ट होते. यामुळे हे अनोख्या प्रकारचे संशोधन ठरले आहे.’

कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या बहुतेक अभ्यास अहवालांमध्ये आतापर्यंत सार्वजनिक लोकांवर झालेला लसीकरणाचा परिणाम मांडण्यात आला आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या या अभ्यास अहवालामध्ये कोविड- 19 ची लागण झालेल्या रुग्णांचा पैलू विशेषत्वाने मांडण्यात आला आहे. लसीकरणाचे वैद्यकीय फायदे समजून घेण्याबरोबरच त्याचे आर्थिक परिणाम जाणून घेण्याच्या मुख्य उद्देशाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सच्या संयुक्त उपाध्यक्ष डॉ. मधुमालती रामकृष्णन म्हणाले, ‘आमच्या या अहवालात पॅन भारतातील कोविडग्रस्त रुग्णांची माहिती विचारात घेण्यात आली आहे. लसीकरणाचे वैद्यकीय फायदे आणि आर्थिक परिणाम जाणून घेण्याचे ध्येय त्यामागे होते. या अहवालात मांडण्यात आलेल्या सारांशानुसार हॉस्पिटलमधील वास्तव्य, उपचारांचा खर्च आणि संसर्गामुळे होणारे मृत्यू अशा विविध निकषांवर लस घेतलेल्यांना लस न घेतलेल्यांच्या तुलनेत फायदा झाला आहे.’

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: