सातारा 

शिवेंद्रराजेंमुळे मिळाल्या ७ आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका

सातारा (​महेश पवार) :
कोरोना संसर्गाच्या काळात रूग्णवाहिकांचा तुटवडा भासत असतानाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा व जावली तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्यकेंद्रांसाठी रूग्णवाहिका मिळाल्याने आरोग्ययंत्रणेसाठी हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.

सातारा जिल्हयातील ग्रामपंचायतीकडील १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून सातारा जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या मान्यतेनुसार खरेदी करण्यात आलेल्या रूग्णवाहिकांचे लोकार्पण आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
वाढत्या कोरोना संसर्गाचा जास्त फटका हा जिल्हयातील अन्य तालुक्या पेक्षा सातारा व जावली तालुक्यातील जनतेला सहन करावा लागला आहे . सातारा व जावली तालुक्याचे लोकप्रतिनीधी या नात्यानेच नव्हे तर या मातीशी जुळलेल्या आपुलीकीच्या भावनेने कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासूनच आजतागायत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. रूग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळवून देणे, असो की लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनता,लहान मोठया व्यवसायीकांवर ओढावलेली आर्थिक परिस्थिती असो सर्वानाच मदतीचा हात देण्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नेहमीच आघाडीवर राहिले आहेत . मतदारसंघात ठिकठिकाणी कोरोना आयसोलेशन सेंटरची उभारणी करून रूग्णांना दिलासा मिळवून दिला आहे. तर सातारा शहरातील प्रभागांमध्ये तसेच ग्रामीण भागातील लोकांना कोविड प्रतिबंधीत लसीकरणाचा जास्ती जास्त लाभ घेता यावा यासाठी लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्याबरोबरच त्यांनी संपुर्ण जिल्हयाला जास्तीचा लस पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा आरोग्य आधिकारी आणि राज्याचे लस वितरण अधिकारी दिलीप पाटील यांना वेळोवेळी सुचनाही केलेल्या आहेत.
दरम्यान आपल्या मतदारसंघाला जास्तीजास्त रूग्णवाहिका दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्हा परिषद आणि शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. रूग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णांना तातडीने सेवा देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे . सातारा जिल्हयात कोरोना महामारीचा विळखा सुटता सुटत नाही. दुसरी लाट संपायचे नाव घेत नसतानाच तिस-या लाटेची सुचक घंटा आरोग्य विभागाने दिली आहे  कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी या महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमात राहून स्वतःचा आणि इतरांचा जीव कोणीही धोक्यात घालू नये .स्वत:च्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे भावनिक आवाहनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: