सातारा 

लग्नातील खर्च वाचवून केली जनसेवा

पाचगणी (महेश पवार) :

देश सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. या संकटात माणुसकीची भावना अधिक बळकट होत असल्याचं दाखवून देणाऱ्या घटना आपल्या समोर येत असतात. जावली तालुक्यातील काटवली गावातील पत्रकार रविकांत बेलोशे यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील खर्चात काटकसर करून दहा हजार एक रुपये रक्कम आळंदी येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेला आणि सुमारे वीस हजार रुपयांचे आरोग्य साहित्य काटवली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला दिले त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन होतं आहे.

पाचगणी येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी रविकांत बेलोशे यांची कन्या प्रणिता व घोटेघर तालुका जावली येथील संपत रांजणे यांचे चिरंजीव विनोद यांचा विवाह नुकताच भिलार या पुस्तकांच्या गावात पार पडला. रविकांत बेलोसे यांचे वडील कै. दिनकर कोंडीबा बेलोसे हे अध्यात्मिक क्षेत्राशी आयुष्यभर निगडित असल्याने या लग्न खर्चातील काटकसर करून उरलेल्या पैसे याच क्षेत्रात आळंदी येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोगी यावेत यासाठी याच लग्नसमारंभात दहा हजार एक रुपयांचा निधी बेलोसे यांनी संस्थेच्या संचालिका ज्योतीताई मतकर यांचेकडे वधू-वरांच्या हस्ते सुपूर्द केला. या बरोबरच आरोग्य किट संस्थेसाठी देण्यात आले.

याच पद्धतीने आपली जन्मभूमी असणाऱ्या काटवली येथील नव्यानेच स्थलांतरित झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ही बेलोसे यांनी हेल्थ प्लस मेडिकल ग्रुपचे सदस्य हणमंतराव पवार,  शैलेश वैश्य ,निलेश पवार , शिल्पा पवार, जितेश पवार,  राहुल तिवारी यांच्या सहकार्यातून आणि  भोसे येथील राधा कृपा आश्रम, स्वामी कृष्णदास राधा कृपा ट्रस्ट व ब्रिजांचल ट्रस्ट यांच्यावतीने व भाऊसाहेब दानवले यांच्या सहकार्याने सुमारे वीस हजार रुपयांचे आरोग्य किट नवरी मुलीच्या हस्ते भेट देण्यात आले.

रविकांत बेलोशे यांनी लग्नातील अनाठायी खर्च टाळून तो वारकरी संस्थेतील मुलांसाठी देऊन आदर्शवत काम केलं आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नावर होणारा खर्च देखील या कोरोना काळात अनाथ मुलांसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. बेलोशे हे पत्रकार असून सामाजिक सेवेत ते आपल्या परीने आपले योगदान देत आहेत. या त्यांच्या सामाजिक दातृत्वाच्या दृष्टीने अनेक समाजोपयोगी कामे उभी राहिली आहेत. या त्यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: