गोवा 

​काँग्रेसला​ सत्तेत आणण्यात ​’यांची’ भूमिका ठरणार महत्वाची’

मडगाव/पणजी ​:
​​कॉंग्रेस पक्षाने महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना चालीस लावल्या. कॉंग्रेसच्या सरकारानी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला सत्तेत आणण्यासाठी गोव्यातील महिला महत्वाची भूमीका बजावणार असे प्रतिपादन अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. सिमा फर्नांडिस यांनी केले.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे दहा महिल गट समित्यांना नियुक्ती पत्रे देण्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक हजर होत्या.

 

दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉरिस टेक्सेरा, मडगाव, उर्सिला कॉस्ता, काणकोण, ॲल्ड्रीना, केपे, सोनिया फर्नांडिस, कुंकळ्ळी व रजनी रायकर, नावेली यांना डॉ. सिमा फर्नांडिस यांनी नियूक्ती पत्रे दिली. उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात महिला कॉंग्रेस निरीक्षकांनी रोशन देसाई, वाळपय, पार्वती नागवेकर, शिवोली, सोनल मालवणकर, साळीगांव, पेलिजा पिरीस, सांत आंद्रे व मारिया क्रिस्तीना वरेला, कुंभारजूवा यांना डॉ. सिमा फर्नांडिस यांनी नियुक्तीपत्रे दिली.

 

गोवा प्रदेश महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी यावेळी बोलताना सर्व महिला कॉंग्रेस सदस्यानी कॉंग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी झटावे  असे आवाहन केले. महिला कॉंग्रेस कोविड संकटात तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महिलांसाठी मदत करण्याची योजना राबविणार असल्याचे बिना नाईक यांनी सांगितले.

संपुर्ण चाळीस मतदारसंघात महिला कॉंग्रेसची बांधणी करून नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती बिना नाईक यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: