गोवा 

 नावेलकर हिल सीटीमध्ये वृक्षारोपण

पणजी :
कदंब पठारावरील नावेलकर हिल सिटी येथे आज वन खात्याकडून वनमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुवे गोवेच्या सरपंच जेनिता मडकईकर, पंच सदस्य विश्वास कुट्टीकर यांची उपस्थिती होती. जेनिता मडकईकर यांच्याच हस्ते फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. विकासाच्या नावाखाली सातत्याने मोठया प्रमाणात वृक्षतोड होत आहे. अशावेळी वृक्षारोपण ही नितांत गरजेची गोष्ट आहे, असे सरपंच मडकईकर यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक आणि पंचायतीचे सदस्य बाणस्तरकर, शेख, भाग्यश्री. रेणुका, छाया पाटील, गोविंद शिरोडकर. जया कुंडईकर यांचीदेखील उपस्थिती होती.
​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: