गोवा 

​मांद्रे भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी दत्ताराम ठाकूर

​पेडणे (प्रतिनिधी) :

​​मांद्रे भाजप किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी हरमल येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम ठाकुर यांची निवड करण्यात आली आहे.​ ​मांद्रे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे राज्य किसान मोर्चा प्रमुख वासुदेव गावकर यांच्या हस्ते पुष्गुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, राज्य कार्यकारिणी किसान मोर्चा सचिव उदय प्रभुदेसाई, सदस्य बाबली राऊत, लक्ष्मण कलांगुटकर, भाजप मांद्रे मंडळ अध्यक्ष मधू परब आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार वासुदेव गावकर म्हणाले,किसान हा देशाचा कणा आहे. त्याचा सन्मान व्हायला हवा. किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी असलेल्या सरकारी योजना आपण सर्वापर्यंत पोचवू या असे त्यांनी सांगितले​. 
आमदार सोपटे यावेळी म्हणाले,पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मेहनत घेवून कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे भाजपही शेतकऱ्यांचे हित जपणारा पक्ष आहे. किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले.

नवनिर्वाचित अध्यक्ष​ दत्ताराम ठाकूर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध आणि सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारा पक्ष आहे आपण १९९२ पासून आजतागायत पक्षाचे कार्य प्रामाणिक पणे करीत आलो आहे त्याचे आज योग्य फळ मिळाले आहे त्याचा योग्य उपयोग करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे सांगितले.
सचिव उदय प्रभुदेसाई यांनीही यावेळी आपले विचार मांडले.​ ​मधू परब यांनी प्रास्ताविक केले. तर​ ​तारा हडफडकर यांनी आभार मानले​.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: