सातारा 

”त्यांच्या’ भेटीत काय झाले त्यावर काय टिप्पणी करणार?’

कराड (अभयकुमार देशमुख) :
काही दिवसापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. आता मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. मोदींनी विरोधी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न वाटतोय. परंतू भेटीत काय झाले याच्या टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी कराड येथे केले.

‘मोदी हटाव देश बचाव’ आंदोलनानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

दरम्यान, ED च्या चौकशा इतक्या सुरु आहेत. मात्र एकही शेवटपर्यंत जात नाही. मधेच ही चौकशी अडकत बसते. काय तडजोड होतेय का माहित नाही ?  एकाही ED च्या केसमध्ये शिक्षा झालीय. कोर्टाने शिक्षा दिल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: